BMW एक उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. आतासुद्धा कंपनीने भारतात आपली अपडेटेड Z4 रोडस्टर लॉन्च केली आहे. हे मॉडेल CBU म्हणून आयात करण्यात येणार आहे. म्हणजेच कार परदेशामध्ये तयार होऊन भारतात थेट विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

2023 BMW Z4 मध्ये काय झाले बदल

फेसलिफ्टेड BMW Z4 मध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये काही किरकोळ बदल केले गेले आहेत. एक कारचे बंपर अपडेट करण्यात आले आहे. नवीन व्हर्टिकल एलईडी लाईट्स आणि अपडेटेड १९ इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. या अपडेटेड स्पोर्ट्स कारचे सॉफ्ट टॉप रूफ इलेक्ट्रीकली केवळ १० सेकंदात उघडू आणि बंद होऊ शकते. Z4 च्या केबिनमध्ये फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

irctc indian railways black box of indian railway crew voice video recording system cvvrs installed in trains loco engine
रेल्वेगाड्यांमध्येही आता विमानासारखी ‘ब्लॅक बॉक्स’ यंत्रणा, अपघात रोखण्यासाठी होईल उपयोग; वाचा
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल
Thief snatched the chain from woman neck and ran away cctv video
चोर निकल के भागा! धावत्या ट्रेनमध्ये चोर महिलेची सोनसाखळी चोरून पसार; प्रवाशांनो “हा” VIDEO एकदा बघाच
BMW iX xDrive50 launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी इलेक्ट्रिक SUV देशात दाखल, सिंगल चार्जमध्ये धावते ६३५ किमी, पण किंमत तर…

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 27 May: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, पाहा १ लीटरसाठी किती मोजावे लागतील रुपये?

इंजिन आणि गिअरबॉक्स

BMW इंडिया Z4 रोडस्टर हे अपडेटेड मॉडेल केवळ M40i या एकाच प्रकारामध्ये विकले जाणार आहे. यामध्ये ३.० लिटर, ६ सिलेंडर इन लाईनचे इंजिन देण्यात आले आहे. जे ३३५ बीएचपी पॉवर आणि ५०० एनएम टॉर्क जनरेट करते. हे ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. ही कार ४.५ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास इतका वेग पकडू शकते. यामध्ये इको प्रो ,कम्फर्ट आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड मिळतात.

2023 BMW Z4 launched in India
बीएमडब्ल्यूने लॉन्च केले Z4 चे अपडेटेड मॉडेल (Financial Express)

हेही वाचा : अवघ्या ३ सेकंदात १०० किमीचा वेग गाठणारी सुपरकार देशात दाखल, विना पेट्रोल धावणार ३१ किमी, किंमत…

किंमत आणि स्पर्धा

2023 BMW Z4 फेसलिफ्ट भारतामध्ये ८९.३० लाख (एक्स-शोरूम) रुपयांना लॉन्च करण्यात आली आहे. Porsche 718 Boxster याशिवाय या २ डोअर स्पोर्ट्स कारला भारतात कोणतीही थेट प्रतिस्पर्धी कार नाही. तथापि Porsche 718 Boxster कार या कारपेक्षा महाग आहे. ज्याची किंमत १. ५२ कोटी रुपये इतकी आहे. 2023 BMW Z4 जूनपासून भारतात बीएमडब्ल्यू डिलर्सकडे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.