Kartik Aaryan Bike Riding: बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला लागोपाठ चित्रपटांच्या आॅफर मिळत आहेत. अत्यंत कमी वेळामध्ये कार्तिकने स्वत: ची एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. तो सोशल मीडियावरही विशेष सक्रिय आहे. कार्तिक आर्यनकडे अनेक बाइकचे संग्रह आहे. आता त्याला आणखी एका बाइकचे वेड लागले आहे. अलीकडेच त्याचा एक व्हिडीओ समोर आला ज्यात तो मुंबईतल्या रस्त्यांवर बाइक रायडिंग करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतल्या रस्त्यांवर बाइक रायडिंग करतानाचा कार्तिकचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कार्तिक रॉयल एनफील्ड कंपनीची सर्वात स्वस्त लेटेस्ट बाइक हंटर ३५० घेऊन फिरताना दिसत आहे. कार्तिक जिममधून बाहेर येतो, हेल्मेट घालतो आणि त्याच्या प्रवासाला निघतो अशी दृष्यं या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. या बाइकवरून फिरताना कार्तिकचे आतापर्यंत दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

(आणखी वाचा : सेकेंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करताय? आता ‘ही’ कंपनी विकणार सेकंड हँड कार; ४० हजार किंमीची वॉरंटीसह मिळणार बरंच काही )

‘अशी’ आहे रॉयल एनफील्ड बाइक हंटर ३५०

नवीन हंटर ३५० ही बाइक बुलेट ३५० आणि क्लासिक ३५० च्या प्लॅटफॉर्मवर विकसित केली गेली आहे. या बाइकमध्ये ३४९ सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन दिलं आहे जे २०.२ बीएचपी पॉवर आणि २७ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही बाइक ५ स्पीड सीक्वेंशनल गिअरबॉक्ससह लॉन्च केली आहे.

ही बाइक रेट्रो थीममध्ये लाँच केली आहे. यामध्ये एक सिंपल हँडलबार तसेच यात सिंगल लाँग पीस सीट आहे. या बाइकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही व्हील्सवर एकच डिस्क ब्रेक आहे. तसेच यात एबीएस उपलब्ध असेल. हंटर ३५० मध्ये अलॉय व्हील्स आहेत.

हंटर ३५० ही रॉयल एनफील्ड कंपनीची सर्वात स्वस्त बाइक आहे. या बाइकची किंमत १.५० लाख रुपयांपासून सुरू होते. या बाइकच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १.६९ लाख रुपये इतकी आहे. कंपनी ही बाइक रेट्रो आणि मेट्रो अशा दोन व्हेरिएंट्समध्ये विकते. कार्तिककडे या बाइकचं टॉप व्हेरिएंट मेट्रो आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor karthik aaryan rode the royal enfield bike hunter 350 on the streets of mumbai pdb
First published on: 01-12-2022 at 14:57 IST