bollywood actor ranbir kapoor seen riding on Mate X electric bike | Loksatta

रणबीरच्या ‘त्या’ अनोख्या वाहनाची चर्चा, मुंबईतील व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या खास फीचर्स

रणबीर नुकताच मुंबईतील बांद्रामध्ये आपल्या Mate X electric bike वर फिरताना दिसून आला.

रणबीरच्या ‘त्या’ अनोख्या वाहनाची चर्चा, मुंबईतील व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या खास फीचर्स
(pic credit – car for you/youtube)

Mate X electric bike : सेलिब्रिटींना देखील कार, बाईक्सची प्रचंड आवड आहे. अभिनेता जॉन अब्राहमकडे अनेक स्पोर्ट्स बाईक आहेत. एका अहवालानुसार, अभिनेता कार्तिक आर्यन अलिकडेच लॅम्बॉर्गिनी उरूस चालवताना दिसून आला होता. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडेही काही दमदार बाईक्सचे कलेक्शन असल्याचे सांगितले जाते. बाईक आवडीच्याबाबतीत अभिनेता रणबीर कपूरही मागे नाही. रणबीर नुकताच मुंबईतील बांद्रामध्ये आपल्या Mate X electric bike वर फिरताना दिसून आला.

कार्स फॉर यू नावाच्या यूट्यूब चॅनेलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर एका अनोख्या वाहनावर फिरताना दिसून येत आहे. दरम्यान पापाराझी त्याचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करत आहेत. रणबीर थोड्यावेळ थांबतो आणि नंतर निघून जातो. एक कॅमेरामॅन रणबीरला या अनोख्या बाईकसह कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी त्याच्या मागे धावतो, मात्र काही वेळाने रणबीरच्या वाहनाचा वेग वाढल्याने कॅमेरामॅन थांबवतो. रणबीर इलेक्ट्रिक बाईकवरून प्रवास करत होता. अनेक लोक इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करतात, यातून भविष्य हे इलेक्ट्रिक वाहनांचे असेल, असे कळते.

(नवीन रंगांसह लाँच झाली SPECIAL EDITION APACHE, १५९ सीसी इंजिन, ‘PULSAR 150’ला देणार टक्कर)

मेटा एक्सचे फीचर

meta x ही लोकप्रिय इलेक्ट्रिक बाईक कंपनी आहे. कंपनीचे काही मोजकेच मॉडल्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मेटा इलेक्ट्रिक बाईकची रेंज १२० किमी असून सर्वोच्च स्पीड २५ किमी प्रति तास आहे. बाईकमध्ये हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टिम, ऑल टेरेन टायर्स, ३ स्टेप फोल्डिंग सिस्टिम, बिल्ट इन यूएसबीसह एलसीडी डिस्प्ले, २५० वॉट इलेक्ट्रिक मोटर, ४८ व्ही बॅटरी देण्यात आली आहे. बाईकची किंमत १.५ लाखांपासून सुरू होते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 17:32 IST
Next Story
नवीन रंगांसह लाँच झाली SPECIAL EDITION APACHE, १५९ सीसी इंजिन, ‘PULSAR 150’ला देणार टक्कर