तुम्ही तुमची पहिली इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. मुंबईतील स्टार्टअप कंपनी पीएमव्ही इलेक्ट्रिक देशात आपली पहिली कार लाँच करणार आहे. या इलेक्ट्रिक कारचे नाव ‘ईएएस – ई’ असे असून ही कार १६ नोव्हेंबरला सादर देशात सादर होणार आहे. या कारचे कंपनीने प्री-बुकिंग अधिकृतपणे सुरू केले आहे. तुम्हाला ही मायक्रो इलेक्ट्रिक कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फक्त दोन हजार रुपयांमध्ये बुक करता येणार आहे.
कशी असेल ही इलेक्ट्रिक कार ?
पीएमवी ईएएस-ई बाबत चर्चा आहे की, ही मायक्रो इलेक्ट्रिक कार असेल जी मारुती अल्टोपेक्षा आकाराने लहान असेल. या कारमध्ये चार लोकांची आसनक्षमता असेल. या कारची टॉप स्पीड ७० किमी प्रतितास असेल. कंपनीचे म्हणणे आहे की, ही इलेक्ट्रिक कार तीन प्रकारांमध्ये सादर केली जाईल, ज्याची रेंज प्रति चार्ज १२० किमी ते २०० किमी असेल. तसेच या ईव्हीमध्ये एक कॉम्पॅक्ट “स्मार्ट कार” ची डिजाइन मिळेल. यात एक क्लॅमशेल बोनट, एलईडी डीआरएलसह स्क्वायर-आउट ग्रिल, सर्कुलर एलईडी हेडलॅम्प यूनिट आणि रेक्ड विंडस्क्रीन मिळेल.
आणखी वाचा : Toyota CNG Car: टोयोटाची पहिली सीएनजी कार भारतात लाँच; जाणून घ्या कारचे खास फीचर्स आणि किंमत
या कारची लांबी २,९१५ मिमी, रुंदी १,१५७ मिमी आणि उंची १,६०० मिमी असेल. त्याचा व्हीलबेस २,०८७ मिमी असेल, तर ग्राउंड क्लीयरन्स १७० मिमी असेल. ही अतिशय हलकी इलेक्ट्रिक कार असणार आहे. ज्याचे वजन सुमारे ५५० किलो असेल.
या आगामी ईव्हीमध्ये मोठ्या खिडक्या, फ्लेयर्ड व्हील आर्च असलेले टायर्स असू शकतात. यात मागील बाजूस एक फुल-विड्थ टेललाइट असेल, अशी चर्चा आहे. इंटीरियर पाहता PMV EaS-E मध्ये मिनिमलिस्ट डॅशबोर्ड आणि फॅब्रिक अपहोल्स्ट्रीसह टू-सीटर मायक्रो ईव्ही असण्याची शक्यता आहे. तसेच यात क्रूज कंट्रोल, पावर विंडो आणि मॅन्युअल एसीसह रिमोट कीलेस एंट्री मिळू शकते.
कंपनीनं माहिती दिली आहे की, या इलेक्ट्रिक कारची किंमत ४-५ लाख रुपये (एक्स शोरूम) असेल.
