scorecardresearch

कार घेण्याचा विचार करताय, सिंगल चार्जमध्ये २०० किमी धावणारी ‘ही’ इलेक्ट्रिक कार, फक्त २ हजार रुपयांमध्ये बुक करा

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार २ हजार रुपयामंध्ये बुक करा.

कार घेण्याचा विचार करताय, सिंगल चार्जमध्ये २०० किमी धावणारी ‘ही’ इलेक्ट्रिक कार, फक्त २ हजार रुपयांमध्ये बुक करा
PMV EaS-E इलेक्ट्रिक कार फक्त 2 हजार रुपयामंध्ये बुक करा.(Photo-financialexpress)

PMV EaS-E Booking: नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीमध्ये असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अतिशय स्वस्तात आणि दमदार फीचर्स असलेली इलेक्ट्रिक कार तुम्हाला खरेदी करण्याची संधी आहे. नुकतीच लाँच झालेली ‘PMV EaS-E’ ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात नवीन आणि स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. ही कार फक्त ४.७९ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) प्रारंभिक किंमतीत सादर करण्यात आली आहे. ही नवीन PMV EaS-E कार फक्त २ हजार रुपयांना बुक करता येणार असून या कारची डिलिव्हरी २०२३ पासून सुरू होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील ईव्ही कंपनी पीएमव्ही इलेक्ट्रिकने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक EaS – E कार भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही कार बुक करू शकतात. कंपनी बुकिंगसाठी दोन हजार रुपयांचे टोकन अमाउंट घेत आहे.

(हे ही वाचा : शानदार ऑफर! केवळ १ लाखांमध्ये घरी आणा Maruti WagonR CNG कार, महिन्याला भरा केवळ ‘इतका’ EMI )

भारतातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार

पीएमव्ही ईएएस ई ही देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार आहे. कारची लांबी २९१५ मिमी, रुंदी ११५७ मिमी आणि उंची १६०० मिमी आहे. कारमध्ये १७० मिमीचा ग्राउंड क्लिअरेन्स मिळतो.

रेंज

कार फुल चार्जनंतर १२० ते २०० किमी पर्यंतची रेंज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कारमधील बॅटरी ४ तासांत फुल चार्ज होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही कार कोणत्याही १५ ए आउटलेटने चार्ज होऊ शकते. कंपनीकडून ३ किलो वॉट एसी चार्जर दिला जात आहे.

(हे ही वाचा : Flashback 2022: सिंगल चार्जवर जबरदस्त रेंज देणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांची मोठी डिमांड )

११ रंगात आहे कार उपलब्ध

यामध्ये ११ कलर ऑप्शन्स दिले आहेत. ब्रिलियंट व्हाइट, डीप ग्रीन, फंकी यलो, मॅजेस्टिक ब्लू, पॅशनेट रेड, पेपी ऑरेंज, प्युअर ब्लॅक, रॉयल बेज, रस्टिक चारकोल, स्पार्कल सिल्व्हर, विंटेज ब्राउन अशा रंगाचा समावेश आहे. तसेच रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिमोट पार्किंग असिस्ट, ओटीए अपडेट्स, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासारखे अनेक स्मार्ट फीचर्स या कारमध्ये उपलब्ध असतील.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 21:05 IST

संबंधित बातम्या