scorecardresearch

KIA च्या नवीन कार ‘Carens’ MPV चे बुकिंग ‘या’ तारखेपासून सुरू होणार, जाणून घ्या फीचर्स

या मॉडेल्समध्ये कंपनीकडून ६ आणि ७ सीटरचे पर्याय दिले जातील ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेन इंजिनचा पर्याय उपलब्ध असेल.

KIAs Carens MPV
किया मोटर्सची नवीन कार (फोटो: PR)

कोरियन ऑटोमोबाईल कंपनी किया मोटर्स (Kia Motors) लवकरच कॅरेन्स MPV भारतात लॉंच करणार आहे. कंपनीने अलीकडेच कॅरेन्स MPV च्या बुकिंगची तारीख जाहीर केली आहे जी १४ जानेवारी आहे. किया मोटर्सच्या मते, कॅरेन्स ५ प्रकारात सादर केली जाईल. ज्यामध्ये प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस आणि लक्झरी प्लस व्हेरिएंट असतील. तसेच, या मॉडेल्समध्ये कंपनीकडून ६ आणि ७ सीटरचे पर्याय दिले जातील ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेन इंजिनचा पर्याय उपलब्ध असेल.

किया कॅरेन्सचे (Kia Carens) एक्सटीरियर

किया मोटर्सच्या या MPV ला हाय-टेक स्टाइलिंग एक्सटीरियर आहे. ज्यांच्या पुढच्या भागात वाघाच्या एका अनोख्या चेहऱ्याची रचना करण्यात आली आहे. त्याच वेळी, या एमपीव्हीमध्ये इनटेक ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि डेटाइम रनिंग लाइट्स बसवण्यात आले आहेत. त्याच वेळी, किया कॅरेन्सची लांबी ४५४० एमएम, रुंदी १८००एम एम आणि उंची १७००एम एम आहे.

(हे ही वाचा: प्रीमियम फीचर्स, कमी किमतीत आणि जास्त मायलेज असलेल्या ‘या’ आहेत भारतातील टॉप ३ कार!)

किया कॅरेन्सचे इंटिरिअर

किया मोटर्सच्या या MPV चे बाह्य भाग हे उच्च-तंत्रज्ञानाप्रमाणेच तितकेच सुरक्षित फीचर्सने सुसज्ज आहे. किया कॅरेन्समध्ये ३६० डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन चार्जिंग, मल्टिपल एअरबॅग्ज, १०.२५ इंच ऑडिओ व्हिडीओ नेव्हिगेशन टेलीमॅटिक्स (AVNT) डॅश बोर्डच्या मध्यभागी आहे, जे आधुनिक टच देते.

(हे ही वाचा: ‘ही’ आहे भारतातील स्वस्त ७ सीटर फॅमिली कार; किंमत ८ लाखांपर्यंत)

किया कॅरेन्सचे सेफ्टी फीचर्स

या MPV मध्ये ६ एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल स्टार्ट असिस्ट, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, रियर पार्किंग सेन्सर्स आणि डिस्क ब्रेक्स, एअर प्युरिफायर, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, यासह अनेक मानक आणि सेफ्टी फीचर्स आहेत.

(हे ही वाचा: Hero Pleasure Plus vs Honda Activa 6G: किंमत, मायलेज आणि स्टाइलमध्ये कोणता आहे सर्वोत्तम पर्याय? जाणून घ्या)

किया कॅरेन्सचे संभाव्य इंजिन

किया या MPV मध्ये १.५ लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देऊ शकते. जे ११५ bhp पॉवर आणि १४४ Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच डिझेल इंजिनमध्ये १.५ लीटर डिझेल इंजिनही दिले जाऊ शकते. जे ११५ bhp पॉवर आणि २५०Nm टॉर्क जनरेट करू शकते. त्याच वेळी, ६ स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह या MPV मध्ये ६ स्पीड iMt आणि 7 स्पीड DCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय दिला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2022 at 14:51 IST