नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाईल उत्‍पादक कंपनीने आज १० ऑक्‍टोबर २०२२ रोजी त्‍यांच्‍या ईव्‍ही समूहामधील नवीन ‘Tata Tiago’ ईव्‍हीच्‍या बुकिंगच्‍या शुभारंभाची घोषणा केली आहे. ही कार पहिल्‍या १०,००० ग्राहकांसाठी ८.४९ लाख रूपये (संपूर्ण भारतात – एक्‍स-शोरूम) या स्‍पेशल सुरूवातीच्‍या किंमतीमध्‍ये लाँच करण्‍यात आली आहे, ज्‍यापैकी २००० मॉडेल्‍स नेक्‍सॉन ईव्‍ही व टिगोर ईव्‍हीच्‍या विद्यमान मालकांसाठी आरक्षित असतील. नवीन Tata Tiago EV कार फक्त २१,००० रुपयांना बुक करता येईल.

टाटाच्या या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी जानेवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. Tiago EV ची किंमत ८.४९ लाख रुपये आहे जी टॉप व्हेरियंटसाठी ११.७९ लाख रुपये आहे. ही फक्त सुरुवातीची किंमत आहे जी पहिल्या १०,००० ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

काय म्हणाले टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे प्रमुख?

बुकिंग्‍जच्‍या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.च्‍या विपणन, विक्री व सेवा धोरणाचे प्रमुख विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, “टियागो ईव्‍ही ही उत्‍साहपूर्ण इलेक्ट्रिक ट्रेण्‍डसेटर, विभागात धुमाकूळ निर्माण करणारी कार आहे. या कारमध्‍ये प्रिमिअम, सुरक्षितता व तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये, पर्यावरणास अनुकूल फूटप्रिंट, उत्‍साहपूर्ण कार्यक्षमता अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. सर्व ट्रिम्‍समध्‍ये प्रमाणित म्‍हणून दर्जात्‍मक कनेक्‍टेड वैशिष्‍ट्यांनी युक्‍त विभागतील पहिली कार आहे, जी सामान्‍यत: अधिक प्रिमिअम कार्समध्‍ये ऑफर केली जातात. तसेच आमच्‍या ईव्‍ही अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या मनसुब्‍यासह व या लाँचसह आम्‍ही ८० नवीन शहरांमध्‍ये प्रवेश करत आहोत, ज्‍यामुळे आमचे नेटवर्क १६५ हून अधिक शहरांपर्यंत विस्‍तारित होत असल्याचे, त्यांनी यावेळी सांगितले. 

आणखी वाचा : दिवाळी धमाका! ऑक्टोबर महिन्यात Virtus आणि Taigun या कार्सवर बंपर डिस्काऊंट; मिळेल एवढी सूट…

टियागो ईव्‍हीचे वैशिष्‍ट्ये

टाटाची ही इलेक्ट्रिक कार १९.२ kWh बॅटरीसह ६० bhp पॉवर आणि ११० एनएम टॉर्क निर्माण करते आणि एका चार्जवर २५० किमीची रेंज देते. त्याच वेळी, २४ kWh बॅटरीसह, ती ७४ bhp पॉवर आणि ११४ न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करते आणि एका चार्जमध्ये ३१५ किमीची श्रेणी प्रदान करते.

Tiago EV ला ७.२ kW AC फास्ट चार्जरसह १० ते १०० टक्के चार्ज होण्यासाठी ३.६ तास लागतात. दुसरीकडे, ही इलेक्ट्रिक कार DC फास्ट चार्जरने केवळ ५७ मिनिटांत १०-८० टक्केपर्यंत चार्ज केली जाऊ शकते.

Tiago EV मध्ये ७-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिकली-फोल्डेबल ORVM, लेदर सीट इ. याला ४५ कनेक्टेड कार वैशिष्ट्यांसह ZConnect अॅपची कनेक्टिव्हिटी मिळते, ज्याच्या मदतीने तुम्ही रिअल टाइम चार्ज स्थिती, कारचे स्थान आणि एसी चालू/बंद करू शकता.

सुरक्षिततेच्या दृष्टीने, Tiago EV ला स्टार्ट आणि डिसेंट असिस्ट, i-TPMS, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, पुश बटन स्टार्ट/स्टॉप आणि क्रूझ कंट्रोल मिळतात. यात सिटी आणि स्पोर्ट असे दोन ड्रायव्हिंग मोड आहेत.

आणखी वाचा : इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीदारांसाठी आनंदवार्ता : दिवाळीपूर्वीच ओला सादर करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

अशा पद्धतीने करा बुकिंग

  • टियागो ईव्‍ही ही कार कोणत्‍याही अधिकृत टाटा मोटर्स डिलरशिपमध्‍ये किंवा http://www.Tiago.ev.tatamotors.com या वेबसाइटवर २१,००० रूपये बुकिंग रक्‍कम भरत बुक करता येईल.
  • टियागो ईव्‍ही ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये प्रमुख शहरांमधील आघाडीच्‍या मॉल्‍समध्‍ये प्रदर्शनार्थ ठेवण्‍यात येईल.
  • ग्राहकांसाठी टेस्‍ट ड्राइव्‍ह्स डिसेंबर २०२२ च्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यापासून उपलब्‍ध असतील.
  • टियागो ईव्‍हीच्‍या डिलिव्‍हरींना जानेवारी २०२३ पासून सुरूवात होईल.
  • वेळ, तारीख, तसेच निवडण्‍यात आलेला व्‍हेरिएण्‍ट व रंगानुसार वेईकलची डिलिव्‍हरी तारीख ठरवण्‍यात येईल.
  • डिलिव्‍हरीच्‍या वेळी ग्राहकांच्‍या अपेक्षांची पूर्तता करण्‍यासाठी ग्राहक अभिप्रायांनुसार २४ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक व्‍हेरिएण्‍ट्सच्‍या उत्‍पादनाला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. 
  • टियागो ईव्‍हीबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक Tiagoev.tatamotors.com या वेबसाइटला किंवा जवळच्‍या डिलरशिपला भेट देऊ शकतात.