देशातील दुचाकी क्षेत्रात इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक्सची संख्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे त्यांची मागणी वाढत आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर कमी बजेटमध्ये येतात आणि पेट्रोलच्या किंमतीशिवाय मोठी रेंज देतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या रेंजमध्ये, आज आम्ही BOOM MOTORS कडून इलेक्ट्रिक मोपेड BOOM CORBETT 14 बद्दल बोलत आहोत, जे इलेक्ट्रिक टू व्हीलर बनवणारे एक स्टार्टअप आहे. ही स्कूटर तिच्या स्टायलिश डिझाईन, मोठी रेंज आणि कमी किंमतीमुळे पसंत केल्या जातात.

जर तुम्ही घरगुती किंवा व्यावसायिक वापरासाठी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या इलेक्ट्रिक मोपेडची किंमत, रेंज आणि फीचर्स यांचे संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या.

आणखी वाचा : केवळ ६८ हजार रूपये भरून घरी घेऊन जा Hyundai Santro Asta चा टॉप सेलिंग व्हेरिएंट, वाचा संपूर्ण ऑफर

या इलेक्ट्रिक मोपेडच्या बॅटरी आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने यामध्ये ४ kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. या बॅटरी पॅकसह, कंपनीने ४००० डब्ल्यू पॉवरची इलेक्ट्रिक मोटर जोडली आहे जी BLDC तंत्रज्ञानावर आधारित आहे.

या बॅटरी पॅकच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर हा बॅटरी पॅक २.५ ते ४ तासांत पूर्ण चार्ज होतो.

मोपेडच्या रेंज आणि वेगाबाबत, कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर, हे इलेक्ट्रिक मोपेड १८० किमीची रेंज देते. या रेंजसह ६५ kmph चा टॉप स्पीड उपलब्ध आहे.

आणखी वाचा : Two Wheeler Finance Plan: केवळ ९ हजार रूपये देऊन खरेदी करा TVS Jupiter चं स्टॅंडर्ट व्हेरिएंट

मोपेडमध्ये दिलेल्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्याच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक लावले आहेत. यासोबत अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर्सचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम, चार्जिंग पॉइंट, डिजिटल घड्याळ, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, पुश बटण स्टार्ट, मोबाइल ऍप्लिकेशन कनेक्टिव्हिटी, एलईडी हेड लाइट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, कमी बॅटरी इंडिकेटर, इत्यादी सारखे फीचर्स मिळतील.

या इलेक्ट्रिक मोपेडच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ८६,९९९ रूपयांच्या सुरूवातीच्या किमतीने ही स्कूटर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. टॉप व्हेरिएंटवर या स्कूटरची किंमत १ लाख २० हजार इतकी आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boom corbett 14 electric moped claims range of 180 km know price and features details prp
First published on: 05-08-2022 at 21:38 IST