आता ‘विना बॅटरी’ इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेऊ शकता; भारतीय कंपनीने आणली नविन स्कीम

बंगळुरूची स्टार्टअप कंपनी बाउन्स इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात पदार्पण करत आहे.

Bounce_Electric_Scooter
आता 'विना बॅटरी' इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेऊ शकता; भारतीय कंपनीने आणली नविन स्कीम (Photo- Financial Express)

बंगळुरूची स्टार्टअप कंपनी बाउन्स इन्फिनिटी इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात पदार्पण करत आहे. कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनी लवकरच प्री बुकिंग सुरु करणार आहे. तर ग्राहकांना गडी जानेवारी २०२२ पर्यंत हातात मिळणार आहे. स्कूटरच्या किंमत किती असेल?, याबाबत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केलं जाण्याची शक्यता आहे. या सोबतच कंपनी एक खास स्किमपण लॉन्च करणार आहे. या स्किमसह विना बॅटरी स्कूटर खरेदी करू शकता.

बाउन्स इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये काढता येण्याजोगी लिथियम-आयन बॅटरी आहे. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार बॅटरी काढू आणि चार्ज करू शकतात. आगामी इलेक्ट्रिक स्कूटर स्वॅप करण्यायोग्य बॅटरी सिस्टमसह सुसज्ज असेल. म्हणजेच स्कूटरमधून एक बॅटरी काढून कंपनीची दुसरी बॅटरी बसवता येते. एवढेच नाही तर बॅटरी असलेली स्कूटर खरेदी करण्याऐवजी ग्राहकांना कंपनीकडून भाड्याने बॅटरीही घेता येणार आहे. म्हणजेच बॅटरीची संपूर्ण किंमत भरण्याऐवजी त्यांना थोडेसे भाडे द्यावे लागेल.

हिरो मोटोकॉर्पची पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी जोरदार तयारी; जाणून घ्या किंमत

कंपनीच्या या स्किममुळे इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ४० टक्क्यांनी कमी होईल. स्कूटरची किंमत ६०-७० हजारांच्या घरात असण्याची शक्यता आहे. या गाडीची तुलना OLA S1 इलेक्ट्रिक स्कूटर्सशी होणार आहे. बाउंस एक स्कूटर रेंटल सर्व्हिस देणारी कंपनी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bounce infinity electric scooter with removable battery soon launch rmt

Next Story
हिरो मोटोकॉर्पची पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी जोरदार तयारी; जाणून घ्या किंमतHero_Motocorp_EV