बाउन्स इनफिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर २ डिसेंबरला होणार लॉन्च; ४९९ रुपयांपासून बुकिंग

स्कूटर भाड्याने देणारी स्टार्टअप कंपनी बाउन्स आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर इनफिनिटी लॉन्च करणार आहे.

Bounce-Infinity
बाउन्स इनफिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर २ डिसेंबरला होणार लॉन्च; ४९९ रुपयांपासून बुकिंग (Photo- Financial Express)

ऑटोमोबाईल क्षेत्रात आता इलेक्ट्रिक वाहनांचं युग सुरु झालं आहे. बाजारपेठ पाहता एक एक करत अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनं बाजारात आणत आहेत. आता स्कूटर भाड्याने देणारी स्टार्टअप कंपनी बाउन्स आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर इनफिनिटी लॉन्च करणार आहे. स्कूटरचं लॉन्चिंग २ डिसेंबरला होणार आहे. यासाठी प्री-बुकिंग त्या दिवसापासून सुरू होणार आहे. बुकिंसची रक्कम ४९९ रुपयांपासून सुरु होणार आहे. इनफिनिटी इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये फिचर्स ग्राहकांना आकर्षित करतील.

बाउन्स इन्फिनिटीमध्ये एक स्मार्ट काढता येण्याजोगी लिथियम-आयन बॅटरी आहे. ग्राहक त्यांच्या सेवा आणि गरजेनुसार काढू शकतात आणि चार्ज करू शकतात. दुसरीकडे, ग्राहकांची इच्छा असल्यास बॅटरीशिवाय स्वस्त दरात ही ई-स्कूटर खरेदी करू शकतात आणि बाउन्सच्या बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कचा वापर करू शकतात, असं कंपनीने म्हटले आहे. २२ मोटर्स कंपनीसोबतच्या कराराचा एक भाग म्हणून, बाऊन्सने राजस्थानमधील भिवडी येथील उत्पादन प्रकल्पात काम सुरू केले आहे, असे कंपनीने सांगितले. या प्लांटमध्ये दरवर्षी १ लाख ८० हजार स्कूटर तयार करण्याची क्षमता आहे.

पाच मिनिटांच्या चार्जिंगमध्ये गाडी धावते २०० किलोमीटर; गाडीत काय वैशिष्ट्य आहे वाचा

बाउन्स आपली पहिली इनफिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर २ डिसेंबरला लॉन्च करेल. ‘मेड इन इंडिया’ स्कूटर फक्त ४९९ रुपये भरून बुक केली जाऊ शकते, असं बाऊन्सने सांगितले आहें.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bounce will soon launch its firstever electric scooter infinity in the country rmt

Next Story
आता ‘विना बॅटरी’ इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेऊ शकता; भारतीय कंपनीने आणली नविन स्कीमBounce_Electric_Scooter
ताज्या बातम्या