Bugatti Chiron Profilee ही जगातील सर्वात महागडी नवीन कार ठरली आहे, ही कार ९.७ दशलक्ष युरोमध्ये लिलावात विकली गेली आहे, Bugatti-Rimac चे सीईओ Mate Rimac यांनी असा दावा केला आहे.

बुगाटी चिरॉन ही फ्रेंच ऑटोमेकरसाठी यश ठरले आहे. सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींच्या घरात स्थान मिळवण्यापासून ते चांगली विक्री होईपर्यंत या मॉडेलने आपले स्थान पक्के निर्माण केले आहे. आता मॉडेलच्या ५०० बिल्ड स्लॉट्स आणि त्याच्या प्रकारांव्यतिरिक्त, हायपरकार निर्मात्याने प्री-सीरीज मॉडेल, म्हणजेच चिरॉन प्रोफाइल देखील विकले आहे. एक-ऑफ मॉडेल नव्वद दशलक्ष, सातशे नव्वद हजार पाचशे युरो (९,७९२,५०० युरो किंवा अंदाजे ८७ कोटी रुपये) मध्ये विकले गेले आहे.

ifs officer parveen kaswan shares video of forester extinguishing terrible forest fire goes viral
जंगलात लागली भयानक आग, झाडे झाली जळून खाक! आग शमविताना झाली वनकर्मचाऱ्यांची दमछाक, पाहा थरारक Video
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच
Kia adds two new automatic variants
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Kia ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे आणले २ नवे व्हेरिएंट, किंमत…

फ्रान्समधील पॅरिसमध्ये कारचा लिलाव झाल्यानंतर या मॉडेलला आश्चर्यकारक किंमत मिळाली. या किंमतीसह, Bugatti-Rimac चे CEO, Mate Rimac यांनी दावा केला की, Bugatti Chiron Profile ही आता लिलावात विकली गेलेली जगातील सर्वात महागडी नवीन कार आहे.

(हे ही वाचा : जबराट! ‘या’ कारची जगभरात चर्चा, अवघ्या ३ सेकंदात १०० किमीचा वेग, बॅटरीशिवाय धावणार २००० किमी..!)

Bugatti Chiron Profilee ‘अशी’ आहे खास

Bugatti Chiron Profilee ही सर्वात वेगवान कार मानली जाते. जबरदस्त पॉवर आउटपुट, आश्चर्यकारक गती आणि दुर्मिळ असण्याव्यतिरिक्त बुगाटी चिरॉन प्रोफाईलची जबरदस्त डिझाइन देखील आहे. याशिवाय कारला एक अनोखा ‘अर्जेंटिना अटलांटिक’ पेंटवर्क देखील मिळतो. हे कारला एक अतिशय अनोखे स्वरूप देते.

बुगाटी चिरॉन प्रोफाइलने “लिलावात विकल्या गेलेल्या सर्वात महागड्या नवीन कारचा” विक्रम प्रस्थापित केला. Profilee मध्ये एकूण १,४७९ एचपी आणि १,१८० lb-ft टॉर्क असलेले ८.०-लिटर क्वाड-टर्बो W१६ इंजिन आहे. ते फक्त २.३ सेकंदात शून्य ते ६२ mph पर्यंत जाऊ शकते.