सणासुदीच्या हंगामानंतर आता सर्व वाहन निर्मात्यांनी त्यांच्या कारवर वर्षअखेरीस सूट देण्यास सुरुवात केली आहे. यात आता होंडा आणि ह्युंदईनंतर महिंद्रा अँड महिद्राचं नाव जोडलं गेलं आहे. महिंद्रा आपल्या निवडक पाच गाड्यांवर मोठी सवलत देत आहे. ही किंमत रु. ८१ हजारपर्यंत असणार आहे. या सवलतीमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट आणि इतर फायद्यांसह अॅक्सेसरीजचा समावेश आहे. महिंद्राची ही सवलत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वैध आहे. मात्र ग्राहकांच्या फीडबॅकच्या आधारे कंपनी ही सवलत पुढेही सुरू ठेवू शकते. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर महिंद्राच्या कोणत्या एसयूव्हीवर तुम्हाला किती सूट मिळू शकते? ते जाणून घ्या.

  • महिंद्रा Alturas: महिंद्रा Alturas G4 ही कंपनीची एक प्रीमियम एसयूव्ही आहे. या गाडीवर कंपनी ८१ हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनी या एयूव्हीवर ऑफरमध्ये ५० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. तर ११,५०० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आणि २० हजार रुपयांपर्यंत इतर सूट देत आहे. , Mahindra Alturas G4 ची सुरुवातीची किंमत २८.७७ लाख रुपये आहे. टॉप मॉडेलमध्ये ३१.७७ लाख रुपयांपर्यंत जाते.
  • महिंद्रा XUV300: महिंद्रा XUV300 ही गाडी कंपनीने नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह लॉन्च केली आहे. या मॉडेलवर कंपनी ६९,००० रुपयांपर्यंत सूट आणि इतर फायदे देत आहे. महिंद्रा या कारवरील ऑफरमध्ये ३०,००० रुपयांची रोख सूट देत आहे. ज्यामध्ये २५ हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ४,५०० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट दिली जाईल. याशिवाय कंपनी या एसयूव्हीवर १० हजार रुपयांपर्यंत इतर सूटही देत ​​आहे. महिंद्रा XUV 300 ची सुरुवात किंमत ७.९५ लाख रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत १३.४६ लाखापर्यंत जाते.

Vmoto Soco ग्रुपने सादर केली स्टायलिश फ्लीट कॉन्सेप्ट fo1; सिंगल चार्जमध्ये धावते ९० किमी

byju s starts paying salary of march
‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
  • महिंद्रा Marazzo: महिंद्रा Marazzo ही एकमेव लोकप्रिय ७ सीटर एमपीव्ही आहे. कंपनी या गाडीवर ४०,२०० रुपयांची सूट देत आहे. कंपनी २० हजार रुपयांची रोख सूट देईल. एक्सचेंज बोनस १५ हजार रुपयेपर्यंत असेल. महिंद्रा मराझोची किंमत १२.४२ लाखांपासून सुरु होते आणि टॉप व्हेरियंटमध्ये १४.५७ लाखांपर्यंत जाते.
  • महिंद्रा KUV100 NXT: महिंद्रा KUV100 NXT ही एक मायक्रो एसयूव्ही आहे. या गाडीचं स्पोर्टी लूक कारप्रेमींना आवडतो. कंपनी या एसयूव्हीवर ६१,०५५ रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनीने ऑफर केलेल्या सवलतींमध्ये ३८,०५५ रुपयांची रोख सवलत आणि २० हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ४ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. महिंद्रा KUV100 NXT ची किंमत ६.०८ लाख रुपये आहे, टॉप मॉडेल ७.७४ लाख रुपयांना मिळते.
  • महिंद्रा Scorpio: महिंद्रा Scorpio ची गणना कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीमध्ये केली जाते. त्यावर कंपनी ३४ हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनीने जारी केलेल्या सवलतीमध्ये, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, ४ हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि १५ हजार रुपयांपर्यंतचे इतर फायदे दिले जातात, महिंद्र स्कॉर्पिओची सुरुवातीची किंमत १२.७७ लाख रुपये असून टॉप व्हेरियंट १७.६१ लाख रुपये आहे.