scorecardresearch

Cars Discounts Offers: आता होणार तुमची ६१ हजारांची बचत! ‘या’ जबरदस्त कारवर मिळत आहे बंपर डिस्काउंट

‘या’ दोन कारवर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळतोय.

Cars Discounts Offers: आता होणार तुमची ६१ हजारांची बचत! ‘या’ जबरदस्त कारवर मिळत आहे बंपर डिस्काउंट
निसान इंडिया कारवर डिस्काउंट. (Photo-financialexpress)

Cars Discounts Offers: यंदाचं हे वर्ष संपायला आता केवळ काहीच दिवस शिल्लक आहेत. या महिन्यात वाहन उत्पादक कंपन्या त्यांचा स्टॉक रिकामा करण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांवर डिस्काउंट देत आहेत. तुमचाही नवीन कार घेण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दोन कारवर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळत आहे.

ही’ कार कंपनी देतेय बंपर डिस्काउंट

निसान इंडिया वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आपल्या ‘इयर एंड ऑफर’सह बाजारपेठेत धुमधडाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. या वर्षअखेरीच्या ऑफर अंतर्गत देशभरात कंपनीच्या दोन वाहनांवर बंपर डिस्काउंट आणि इतर ऑफर दिल्या जात आहेत. या सवलतीच्या ऑफरअंतर्गत तुम्हाला ६१,००० रुपयांपर्यंतची बचत करता येणार आहे. अशा परिस्थितीत, नवीन वर्षाच्या आधी कंपनीने दिलेली ही बंपर इयर एंड डिस्काउंट आणि ऑफर्स ही ग्राहकांसाठी एक उत्तम भेट आहे.

(आणखी वाचा: Flashback 2022: २०२२ मध्ये ‘या’ टॉप ५ MPV खरेदीसाठी तुटून पडले भारतीय; पाहा यादी! )

निसान इंडियाच्या ‘या’ दोन कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट

कंपनीकडून या महिन्यात Nissan Magnite आणि Nissan Kicks वर सूट देण्यात येत आहे. कंपनीच्या या ऑफर लोकेशन, मॉडेल्स, व्हेरिएंट आणि स्टॉकच्या उपलब्धतेनुसार बदलू शकतात, परंतु तरीही ग्राहकांना कमी किमतीत कार खरेदी करण्याची संधी मिळेल. त्यामुळे, लोक या ऑफरचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या जवळच्या निसान डीलरशिप/शोरूमला भेट देऊ शकतात आणि वर्षाच्या शेवटच्या महिन्यात नवीन कार घरी आणू शकतात.

कोणत्या कारवर किती सूट?

Nissan Kicks

कंपनीकडून निसान किक्सवर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या सवलती दिल्या जात आहेत. पूर्व आणि पश्चिम भागात, कंपनी किक्सच्या टर्बो व्हेरियंटवर १९,००० रुपयांपर्यंत रोख सवलत आणि ३०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे.

(आणखी वाचा: पेट्रोलची चिंता सोडा, आता देशात आली जबरदस्त मायलेजवाली बाईक! किंमत फक्त…)

Nissan Magnite

कंपनीकडून १०,००० रुपयांपर्यंत रोख सवलत/विनामूल्य अॅक्सेसरीज, १५,००० रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि १०,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे.

Nissan ची ही सवलत ऑफर फक्त डिसेंबर २०२२ साठी उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 18:33 IST

संबंधित बातम्या