मस्तच! फक्त ७० हजार डाऊन पेमेंटवर खरेदी करा ‘ही’ जबरदस्त कार; किती भरावा लागेल ईएमआय?

जर तुम्ही कमी बजेटमध्ये कार घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्या उपयोगाची ठरू शकते.

Hyundai-Aura-Base-Model-Finance-Plan
७० हजारात खरेदी करा Hyundai Aura. (Photo-HYUNDAI)

Hyundai Aura Base Model: हॅचबॅक कारनंतर कार क्षेत्रातील सेडान सेगमेंटला सर्वाधिक पसंती दिली जाते, ज्यामुळे या सेगमेंटच्या कार उत्तम फीचर्स आणि मायलेजसह मिड रेंजमध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्ही कमी बजेटमध्ये कार घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्या उपयोगाची ठरू शकते. कंपनीची ऑरा ही कार बाजारात चांगली कामगिरी करत आहे. ही कार तिचे फीचर्स, मायलेज आणि डिझाईनमुळे लोकप्रिय झाली असून या कारची किंमत ६,०८,९०० रुपये इतकी आहे. परंतु तुम्हाला ही आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा ऑरा

फायनान्स प्लॅनसह तुम्हाला ऑरा स्वस्तात खरेदी करता येणार आहे. ह्युंदाई ऑरा खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७० हजार रुपये भरावे लागणार आहेत. इतके पैसे भरून तुम्ही लोन अप्लाय करू शकता. ऑनलाईन डाऊन पेमेंट आणि ईएमआय कॅलक्युलेटरनुसार बँक या सेडान कारवर ६,२४,५२९ रुपयांचं कर्ज देईल. हे कर्ज तुम्हाला ९.८ टक्के व्याजदराने मिळेल. लोन अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला ७० हजार रुपये भरावे लागतील. त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला १३ हजार २०८ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

(आणखी वाचा : नवीन गाडी आत्ताच खरेदी करू नका; पुढील वर्षांत १० लाखांच्या आत लाँच होतायत ‘या’ दमदार फीचर्ससह कार, पाहा यादी )

‘अशी’ आहे ऑरा खास

ह्युंदाईच्या ऑरामध्ये ड्रायव्हर रिअर व्ह्यू म़ॉनिटर, लेदरचा गिअर नॉब, इको कोटींग, इमरजन्सी स्टॉप सिग्नल, एअर कर्टन आदी देण्यात आले आहे.  केबीन ड्युअल टोन रंगात असून मोठी ८.० इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. यामध्ये अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले आहे. रिअर सीट आर्मरेस्टही देण्यात आला आहे. ५.३ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, अॅटो क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट, आरकिम्सचे ४ स्पीकर म्युझिक सिस्टिम आणि किलेस एन्ट्री अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. ह्युंदाईची ही नवीन कार फेअरी रेड, पोलर व्हाईट, टायफून सिल्व्हर, टायटन ग्रे, अल्फा ब्ल्यू आणि व्हिंटेज ब्राऊन या रंगामध्ये आहे.

या कारमध्ये तीन प्रकारचे इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन असणार आहे. बीएस ६ चे १.२ लीटर पेट्रोल इंजिन ८३ पीएसची ताकद देणार असून २०.५ किमी प्रती लीटरच्या मायलेजचा दावा केला आहे. तसेच १.० लीटरचे टर्बो इंजिन देण्यात आले आहे. डिझेलमध्ये १.२ लीटरचे इंजिन देण्यात आले असून इको टर्बो टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 13:44 IST
Next Story
नवीन गाडी आत्ताच खरेदी करू नका; पुढील वर्षांत १० लाखांच्या आत लाँच होतायत ‘या’ दमदार फीचर्ससह कार, पाहा यादी
Exit mobile version