भारतात विविध कंपन्या आपली नवनवीन उत्पादने सादर करताना मिळत आहे. किआ कंपनीने भारतात एन्ट्री केल्यानंतर अल्पावधीतच जम बसवल्याचे दिसून आले. कंपनीची ‘Kia Sonet’ ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील लोकप्रिय कार आहे. इम्पीरियल ब्लू आणि स्पार्कलिंग सिल्व्हर या दोन नवीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत ७ लाख ४९ हजार रुपये इतकी आहे. या कारची ऑन रोड प्राईस ८ लाख ४२ हजार ५६८ रुपये इतकी आहे. आता किआ सोनेट ही कार तुम्हाला अगदी स्वस्तातही खरेदी करता येणार आहे. ते कसे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Kia Sonet ‘अशी’ करा स्वस्तात खरेदी

Kia Sonet रोख पेमेंटमध्ये खरेदी करण्यासाठी, तुम्हाला ८.४२ लाख रुपयांची आवश्यकता असेल, परंतु येथे नमूद केलेल्या योजनेद्वारे तुम्ही ही SUV ८०,००० रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करू शकता. तुमच्याकडे ८०,००० रुपये असल्यास आणि तुम्ही कर्जासाठी अर्ज केल्यास, बँक तुम्हाला ७ लाख ६२ हजार ५६८ रुपयांचे कर्ज देऊ शकते, ऑनलाइन डाउन पेमेंट आणि फायनान्स प्लॅनचे तपशील देणाऱ्या EMI कॅल्क्युलेटरनुसार. या कर्जावर बँक वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारेल.

कर्ज प्रक्रियेत, तुम्हाला Kia Sonet SUV च्या डाऊन पेमेंटसाठी रु. ८०,००० जमा करावे लागतील आणि नंतर कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने सेट केलेल्या कालावधीत (5 वर्षे) दर महिन्याला १६ हजार १२७ रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.

(आणखी वाचा : अरे वा! केवळ १ रुपयांत करा ‘या’ इलेक्ट्रिक बाईकने प्रवास! किंमत फक्त…)

Kia Sonet कशी आहे खास?

SUV मध्ये १.२l पेट्रोलसह 83bhp इंजिन पर्याय आहे आणि ज्याला मानक 5-स्पीड मॅन्युअल मिळते. या किआ कारमध्ये साइड एअरबॅग्ज, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल-असिस्ट कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच, या कारच्या बेस व्हेरिएंट HTE ट्रिममध्ये ABS आणि मागील पार्किंग सेन्सर्स, ड्रायव्हर आणि पॅसेंजर एअरबॅग्ज, मागील एसी व्हेंटसह एअर कंडिशनर, हार्टबीट टेल लॅम्प आहे. ही SUV कार आता ब्रँडच्या नवीन लोगोसह नवीन इंपीरियल ब्लू आणि स्पार्कलिंग सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. कारला ब्लॅक आणि इलेक्ट्रिक-अॅडजस्ट आउट मिररसह प्रीमियम फॅब्रिक सीट्स देखील मिळतात.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buy kia sonet sub compact suv for 80000 know the finance plan pdb
First published on: 08-12-2022 at 20:50 IST