ऐकलं का… मारुतीची लोकप्रिय कार फक्त १ रुपयात खरेदी करता येणार, ऑफर फक्त ‘इतक्या’ दिवसांसाठी…

तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर मारुतीची कार तुम्हाला फक्त १ रुपयात खरेदी करता येणार आहे, जाणून घ्या कसे…

Maruti Car At A Down Payment
मारुतीची कार फक्त १ रुपयात खरेदी करा (Photo-financialexpress)

Maruti Cars 1 Rupee Down Payment: देशाच्या बाजारपेठेत दररोज एक उत्तम कार लाँच केली जाते. पण अनेक लोकांकडे नवीन कार घेण्यासाठी पुरेसे बजेट नसते. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण या बातमीत आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीने दिलेल्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. मारुतीने नुकतीच एक उत्तम ऑफर जारी केली आहे, ज्यामुळे अत्यंत कमी किमतीत कार घेण्याचे स्वप्न तुमचे साकार होऊ शकते.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

या अंतर्गत, तुम्ही कंपनीच्या लोकप्रिय कार मारुती WagonR आणि Alto K10 या फक्त १ रुपये डाऊन पेमेंटवर खरेदी करू शकता, याचा अर्थ कंपनी या कारवर १०० टक्क्यांपर्यंत कर्ज देत आहे. मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की ही, ऑफर फक्त ८ दिवसांसाठी आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या दोन्हीपैकी एक कार खरेदी करायची असेल, तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

(हे ही वाचा : Ertiga, Creta चा गेम होणार; देशात येतेय सर्वात स्वस्त ७ सीटर कार, किंमत आहे फक्त…)

मारुती सुझुकी फक्त १ रुपयात

या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये तुम्ही मारुती WagonR आणि Maruti Alto K10 खरेदी करून तुमचे स्वप्न साकार करू शकता. कंपनी या दोन्ही कारवर आकर्षक फायनान्स प्लॅन ऑफर करत आहे. या फायनान्स प्लॅनमध्ये, तुम्हाला फक्त १ रुपये डाउन पेमेंट करावे लागेल, तर उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज म्हणून फायनान्स केली जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, देशाच्या बाजारपेठेत या दोन्ही कारची सुरुवातीची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे, अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरकडून या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता.

Maruti WagonR वर इतर ऑफर उपलब्ध

१ रुपये डाउन पेमेंट व्यतिरिक्त, कंपनी मारुती WagonR वर ऑफर देखील देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीची ही लोकप्रिय कार खरेदी केल्यास तुम्हाला ६४ हजार रुपयांची मोठी सूटही मिळते. अशा परिस्थितीत, जर तुमची ही कार खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 17:53 IST
Next Story
Tata Nexon EV चा खेळ संपणार, देशात येतेय सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV कार, किंमत फक्त…
Exit mobile version