scorecardresearch

Car Insurance घेताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी, अन्यथा कंपनी..

तुमच्या वैयक्तिक वाहनासाठी विमा पॉलिसी घेणं हे नेहमीच फायदेशीर ठरत असते.

buying insuarance policy for car know all things carefully
कार विमा घेताना घेण्याची काळजी (image credit – financial express)

वाहनासाठी विमा घेतल्यानंतर बिकट प्रसंगी अनेक लाभ मिळविता येतात. मात्र ते सर्वोत्तम कसे ठरतात हे तुम्ही कारसाठी निवड करत असलेल्या विमा योजनेवर अवलंबून आहे. वाहनासाठी विमा योजना घेण्यापूर्वी प्रत्येक खरेदीदाराने संबंधित विमा कंपनीची मूल्ये, आचारसंहिता आदी विविध घटक जाणून घेणे आवश्यक आहे.

तुमच्या वैयक्तिक वाहनासाठी विमा पॉलिसी घेणं हे नेहमीच फायदेशीर ठरत असते. तुम्ही नवीन वाहन खरेदी केले की लगेचच त्याचा विमा काढणे आवश्यक आहे. विमा जुना झाला की तो रिन्यू करावा लागत असतो. सध्या विमा काढून देण्यासाठी अनेक कंपन्या कार्यरत आहेत. मात्र प्रत्येक कंपनीच्या विम्याबाबत अटी-शर्ती या वेगवेगळ्या असू शकतात.

जर तुम्हाला तुमच्या वाहनासाठी विमा पॉलिसी घ्यायची असेल किंवा त्याचे नूतनीकरण करायचे असेल, तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. समजा कार विमा घेताना तुम्ही खाली दिलेल्या गोष्टींची काळजी न घेतल्यास तुम्हाला विमा क्लेम करताना अडचणी येऊ शकतात. म्हणजेच काळजी न घेतल्यास कंपनी क्लेम नाकारू सुद्धा शकते. म्हणून आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्या तुम्हाला विमा पॉलिसी घेताना उपयुक्त ठरू शकतात.

हेही वाचा : Maruti Suzuki चा ग्राहकांना दणका, सर्वात स्वस्त कारचं उत्पादन केलं बंद, पण कारण काय?

कंपनीचा इतिहास हा नेहमी दीर्घकालीन अस्तित्वापासूनच असला पाहिजे असे नाही. तर दावेदारांना देण्यात आलेल्या दाव्याच्या इतिहासावरून तो ठरवावा. यामध्ये कार्याचा इतिहास, सेवा दिलेल्या ग्राहकांची संख्या आणि ग्राहकांवर अर्थपूर्ण प्रभाव असलेले इतर घटक यांचा समावेश आहे.

नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात

अनेक वेळा विम्याचा दावा करताना कंपन्या असे काही करतात की ज्यामुळे ग्राहकांना त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये विमा पॉलिसी घेत असताना तुम्ही त्यामध्ये तुमच्या वाहनाबद्दल आवश्यक गोष्टी आहेत का याची तपासणी केली पाहिजे. तसेच विमा पॉलिसी कंपनीचे नियम व अटी अतिशय काळजीपूर्वक वाचले पाहिजेत.

जर का तुम्ही पहिल्यांदा विमापॉलिसी घेत असाल तर विमा कंपनी निवडण्यापूर्वी तुम्ही एकापेक्षा जास्त कंपनीनकडून पॉलिसीचे कोटेशन घेऊ शकता. त्यासाठी सध्या काही Apps देखील उपलब्ध आहेत. यांच्या मदतीने देखील तुम्ही तुमच्या वाहनाची किंमत आणि विमा पॉलिसीच्या प्रीमियमधील यामध्ये फरक असू शकतो.

हेही वाचा : New Hyundai Verna: हायटेक टेक्नॉलॉजीने लेस असणाऱ्या सेडानमध्ये आहे ‘या’ ५ फीचर्सची कमतरता, जाणून घ्या

क्लेम सेटलमेंट रेशो बघायला विसरू नये

तुम्ही तुमच्या वाहनासाठी कोणत्याही कंपनीची विमा पॉलिसी फाइनल करत अस्ताना त्याचा CSR म्हणजेच क्लेम सेटलमेंट रेशो पहने आवश्यक आहे. हे प्रमाण तुम्हाला सांगते की त्या कंपनीने गेल्या एका वर्षात किती विमा दावे निकाली काढले आहेत. एका वर्षात जास्तीत जास्त CSR सेटल करणारी कंपनी निवडणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे तुम्ही जर का विमा क्लेम केला तर तो मंजूर होण्याची शक्यता वाढते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 13:43 IST

संबंधित बातम्या