scorecardresearch

कार्तिक आर्यनच्या ‘या’ आवडत्या बाईकचे इलेक्ट्रिक व्हेरियंट फक्त २१ हजारात आणा घरी! महिन्याचा ‘इतका’ EMI

तुम्हालाही कार्तिक आर्यनची आवडती बाईक घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.

कार्तिक आर्यनच्या ‘या’ आवडत्या बाईकचे इलेक्ट्रिक व्हेरियंट फक्त २१ हजारात आणा घरी! महिन्याचा ‘इतका’ EMI
कार्तिक आर्यनची आवडती बाईक स्वस्तात खरेदी करा. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारतीय बाजारपेठेत कार कंपन्या ग्राहकांना भरघोस ऑफर्स देत आहेत. तुम्हालाही कार्तिक आर्यनची आवडती बाईक घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आलिशान रॉयल एनफील्ड Royal Enfield Bullet 350 या बाईकचे इलेक्ट्रिक स्टार्ट प्रकार (Royal Enfield Bullet 350 X Electric Start) जे डिझाइन आणि इंजिनच्या बाबतीत प्राधान्य दिले जाते. ते तुम्हाला स्वस्तात घेता येणार आहे. दिल्लीत या बाइकची एक्स-शोरूम किंमत १,९०,०९२ रुपये आहे. पण फक्त १०,८४९ रुपये भरून तुम्ही ही जबरदस्त बाईक तुमच्या घरी आणू शकता. यासाठी एक उत्तम स्कीम आहे, ज्यामुळे तुम्ही कमीत कमी डाऊन पेमेंट भरून ही बाईक सहज खरेदी करू शकता.

(आणखी वाचा : कार्तिक आर्यनला ‘या’ बाइकचे वेड; घेऊन फिरला मुंबईतल्या रस्त्यांवर! )

Royal Enfield Bullet 350 च्या सेल्फ स्टार्ट व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत १,६६,३३७ रुपये आहे आणि रस्त्यावर असताना ही किंमत १,९१,९२५ रुपयांपर्यंत वाढते. या बाईकच्या ऑन-रोड किमतीनुसार, जर तुम्ही ही बाईक कॅश पेमेंट मोडमध्ये विकत घेतली, तर तुमच्याकडे यासाठी सुमारे १.९२ लाख रुपये असावेत. पण इथे आम्ही फायनान्स प्लान सांगत आहोत ज्यामध्ये तुम्हाला ही बाईक फक्त २१,००० रुपयांमध्ये मिळू शकते.

Royal Enfield Bullet 350 X इलेक्ट्रिक स्टार्ट फायनान्स योजना

तुमच्याकडे २१ हजार रुपये रोख असल्यास, ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, बँक तुम्हाला या बाइकसाठी वार्षिक ९.७ टक्के व्याजदराने १,७०,९२५ रुपये कर्ज देईल.

एकदा कर्जाची रक्कम बँकेने मंजूर केल्यानंतर, तुम्हाला रॉयल एनफिल्ड बुलेट 350 च्या डाउन पेमेंटसाठी २१,००० रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर बँकेने परतफेड करण्याचा निर्णय घेतलेल्या कालावधीत (3 वर्षे) दरमहा ५,४९१ रुपये मासिक EMI भरावा लागेल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 11:55 IST

संबंधित बातम्या