scorecardresearch

Second Hand Bike: अरे वा! फक्त १५ हजारात घरी आणा ‘ही’ १ लाखाची बाईक; मिळेल जबरदस्त मायलेज आणखी बरंच काही…

अवघ्या १५ हजारात खरेदी करा १ लाखाची बाईक.

Second Hand Bike: अरे वा! फक्त १५ हजारात घरी आणा ‘ही’ १ लाखाची बाईक; मिळेल जबरदस्त मायलेज आणखी बरंच काही…
अवघ्या १५ हजारात खरेदी करा Bajaj Pulsar 150.(फोटो- DROOM)

Second Hand Bike: तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल.

स्पोर्ट्स बाइक्सच्या सेगमेंटमधील Bajaj Pulsar 150 तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या दमदार स्पोर्ट्स बाइकची एक्स शोरूम किंमत १.०४ लाख रुपये ते १.१४ लाख रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही ही बाइक सेंकड हँड वाहन बाजारातून अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. सेकेंड हँड वाहनांच्या बाजारातून तुम्हाला ही बाइक २० ते २५ हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. जाणून घ्या कसे….

(आणखी वाचा : मारुती सुझुकीची ‘ही’ नवीन SUV फक्त ४० हजार रुपयांमध्ये आणा घरी; लवकर घ्या संधीचा लाभ! )

Second Hand Bajaj Pulsar 150 येथे मिळताहेत स्वस्त

OLX

ओएलक्सवर सेकंड हँड बजाज पल्सर १५० ही बाइक सर्वात स्वस्त सुचीबद्ध आहे. येथून तुम्ही या बाइकचं २०१० चं मॉडेल १५,००० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. येथे तुम्हाला फायनान्स प्लॅनचा देखील पर्याय मिळेल.

DROOM
सेकंड हँड बजाज पल्सर १५० ही बाइक ड्रूम या वेबसाईटवर सर्वात स्वस्तात उपलब्ध आहे. येथून तुम्ही बजाज पल्सर २०११ चं मॉडेल अवघ्या १९,००० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या वेबसाईटवर देखील फानान्स प्लॅनचा पर्याय मिळेल.

Quikr

क्विकर वेबसाईटवर बजाज पल्सर १५० सेकेंड हँड मॉडेल स्वस्तात खरेदी करु शकता. येथून तुम्ही २०१२ चं मॉडेल २० हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. परंतु येथे तुम्हाला फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 18:31 IST

संबंधित बातम्या