Tata Tiago XE CNG: महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमुळे देशभरातले वाहनधारक त्रस्त आहेत. अशातच आता देशात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. सीएनजी हा गॅस पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत स्वस्त असतो. तसेच सीएनजीवर वाहनं अधिक मायलेज देतात. त्यामुळे अनेकजण सीएनजी वाहन खरेदी करणं पसंत करतात. आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सीएनजी कारच्या सध्याच्या रेंजपैकी एक म्हणजे टाटा मोटर्सची हॅचबॅक ‘Tata Tiago XE CNG’ जी कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये गणली जाते. ही सीएनजी कार तुम्हाला आता स्वस्तात खरेदी करता येणार आहे. चला तर जाणून घेऊया कसे…

Tata Tiago XE CNG किंमत

Video Rice Papad Marathi Recipe In Cooker Becomes Four Times After Frying Khichiya Papad Dough Making Papad Khar At Home
कुकरच्या एका शिट्टीत बनवा तांदळाच्या पिठाचे चौपट फुलणारे पापड, लाटायची गरजच नाही, बघा सोपा Video
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Kerala doctors remove 4 cm-long cockroach from man’s lungs
धक्कादायक! व्यक्तीच्या फुफ्फुसातून बाहेर काढले चक्क झुरळ, केरळच्या डॉक्टरांनी केली ८ तासांची वैद्यकीय प्रक्रिया
side effects of vitamin B3
‘व्हिटॅमिन बी ३’चे अतिसेवन ठरू शकते हृदयविकाराचे कारण; जाणून घ्या शरीरासाठी योग्य मात्रा

Tata Tiago XE CNG ची सुरुवातीची किंमत ६,३४,९०० रुपये इतकी एक्स-शोरूम आहे. तर ऑन-रोड, ही किंमत ७,१६,६६८ रुपये होते. या कारची किंमत जाणून घेतल्यानंतर ती खरेदी करण्यासाठी सुलभ फायनान्स प्लॅन जाणून घ्या…

(हे ही वाचा : Mahindra Thar: तुमची आवडती महिंद्रा थार मिळणार आता ‘इतक्या’ स्वस्तात, संधीचा फायदा घ्या! )

Tata Tiago XE CNG फायनान्स प्लॅन

Tata Tiago रोखीने खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७ लाखा रुपयांची आवश्यकता असेल. परंतु फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही ५२ हजार रुपये खर्च करून ही कार घरी नेऊ शकता. ऑनलाइन उपलब्ध डाउन पेमेंट आणि EMI प्लॅननुसार, बँक Tata Tiago चे CNG व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी ६,६४,६३८ रुपये कर्ज देईल आणि बँक या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के व्याजदर आकारेल. कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला किमान डाउन पेमेंट म्हणून ५२ हजार रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर पुढील ५ वर्षांसाठी महिन्याला दरमहा १५,०५६ रुपये मासिक EMI द्यावा लागेल.

टाटा टियागो सीएनजी फायनान्स प्लॅनचे तपशील जाणून घेतल्यानंतर, तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि मायलेजचे संपूर्ण तपशील देखील जाणून घ्या.

(हे ही वाचा : Flashback 2022: ग्राहकांना वेड लावणाऱ्या ‘या’ आहेत देशातील परवडणाऱ्या बाईक्स; मायलेजही दमदार )

Tata Tiago XE CNG mileage
ARAI ने प्रमाणित केलेल्या मायलेजनुसार, CNG किटसह Tata Tiago २६.४९ kmpl मायलेज देते.

Tata Tiago XE CNG Engine and Transmission
Tata Tiago मध्ये ११९९ cc चे इंजिन देण्यात आले आहे, ज्यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हे इंजिन ७२ bhp पॉवर आणि ३५० Nm पीक टॉर्क जनरेट करते.

Tiago XE CNG Features
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने यात मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम सारखे फीचर्स दिले आहेत.