scorecardresearch

BMW-Mercedes सारखी ‘ही’ कार फक्त ११.३२ लाखात! खरेदीसाठी लोकांनी केली गर्दी

BMW-Mercedes सारखी दिसणाऱ्या ‘या’ कारचे लाँच होण्यापूर्वीच ४,००० हून अधिक लोकांनी बुकिंग केले.

BMW-Mercedes सारखी ‘ही’ कार फक्त ११.३२ लाखात! खरेदीसाठी लोकांनी केली गर्दी
Volkswagen Virtus ही कार फक्त ११.३२ लाखात खरेदी करा. (Photo-financialexpress.com)

Volkswagen Virtus: volkswagen india ने गेल्या वर्षी जूनमध्ये नवीन कार ‘Virtus’ लाँच केली होती. या मध्यम आकाराच्या सेडानची खास गोष्ट म्हणजे Virtus ला BMW आणि Mercedes च्या लक्झरी कार प्रमाणेच फीचर्स मिळतात. तुम्हालाही नवीन वर्षात कमी किमतीत लक्झरी कार घ्यायची असेल, तर तुम्ही volkswagen Virtus चा विचार करू शकता. ही कार लाँच होण्यापूर्वीच ४,००० हून अधिक लोकांनी या कारचे बुकिंग केले होते.

Volkswagen Virtus च्या सध्याच्या किमती ११.३२ लाख रुपये ते १६.४२ लाख रुपये, एक्स-शोरूम आहेत. म्हणजे ग्राहकांना अतिशय कमी किमतीत लक्झरी कार मिळते.

(हे ही वाचा : TVS Motors ची ‘ही’ 64 kmpl मायलेजवाली स्कूटर २० हजारात खरेदी करा; लवकर संधीचा लाभ घ्या )

Volkswagen Virtus वैशिष्ट्ये

भारतात Volkswagen Virtus दोन इंजिन पर्यायांसह येते. ज्यामध्ये पहिले १.0L, ३-सिलेंडर TSI टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. जे ११५bhp पॉवर आणि १७८Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. दुसरा पर्याय म्हणून १.५L, ४-सिलेंडर TSI पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन १५०bhp पॉवर आणि २५०Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ६-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक समाविष्ट आहे.

सेफ्टी फीचर्समध्ये यात ६ एअरबॅग्ज मिळतात, ज्यात ड्रायव्हर, फ्रंट पॅसेंजर, 2 पडदे, ड्रायव्हर साइड, फ्रंट पॅसेंजर साइड कव्हर होते. इतर फीचर्समध्ये सीट बेल्ट वॉर्निंग, ओव्हरस्पीड वॉर्निंग, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, अँटी थेफ्ट इंजिन इमोबिलायझर, मिडल रिअर थ्री-पॉइंट सीटबेल्ट, फ्लॅशिंग इमर्जन्सी ब्रेक लाईट, सेंट्रल लॉकिंग इत्यादींचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 20:42 IST

संबंधित बातम्या