BYD Atto 3 Electric SUV: देशात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता विदेशी कंपन्याही भारतात आपल्या इलेक्ट्रिक कार लाँच करत आहेत. अशातच चिनी वाहन निर्माता कंपनी BYD ने (Build Your Dream) आपली नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत नुकतीच लाँच केली आहे. BYD Eto 3 असं या नवीन इलेक्ट्रिक कारचे नाव असून ११ ऑक्टोबर रोजी लाँच झाल्यापासून BYD-Eto 3 ने १,५०० हून अधिक बुकिंग मिळवले आहेत. अखेर आज १४ नोव्हेंबरला कंपनीने या नव्या इलेक्ट्रिक कारची किंमत जाहीर केली आहे.

BYD-Eto 3 इलेक्ट्रिक कारचे फीचर्स

Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
Prohibition of new investment flow in ETFs that have investments abroad
परदेशात गुंतवणूक असणाऱ्या ‘ईटीएफ’मध्ये नवीन गुंतवणूक ओघाला प्रतिबंध; ‘सेबी’च्या फर्मानाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी

या कारमध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले आहेत. यातच ५-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, १२.८-इंच रोटेटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto आणि Apple CarPlay साठी सपोर्ट, ४-वे अॅडजस्टेबल फ्रंट पॅसेंजर सीट, ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर हीटेड सीट, सीट बेल्ट रिमाइंडर सिस्टम, ६-वे सारखे फीचर्स यात ग्राहकांना मिळणार.

याशिवाय यात पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, हिल डिसेंट कंट्रोल, सहा एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ३६० डिग्री कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, पीएम २.५ एअर फिल्टर, सिंथेटिक लेदर सीट्स, वायरलेस फोन चार्जिंग, पॅनोरामिक सनरूफ, रिअर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक, स्पीड अलर्ट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशनसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, लेव्हल २ ADAS सिस्टम, माउंटेड कंट्रोल्ससह फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग यांसारखे फीचर्स ही यात देण्यात आलेले आहे.

आणखी वाचा : Toyota CNG Car: टोयोटाची पहिली सीएनजी कार भारतात लाँच; जाणून घ्या कारचे खास फीचर्स आणि किंमत

ही कार ५० मिनिटांत ० टक्के ते ८० टक्के पर्यंत जलद चार्जिंगला सपोर्ट करते. ARAI चाचणीनुसार ६०.४८ kWh च्या उच्च बॅटरी क्षमतेसह ही कार ५२१ किमी पर्यंतचा प्रवास करू शकते. कंपनीचा दावा आहे की, ही एसयूव्ही ७.३ सेकंदात ०-१०० किमी/ताशी वेग पकडू शकते. BYD-Eto 3, चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात बोल्डर ग्रे, पार्कौर रेड, स्की व्हाईट आणि सर्फ ब्लू कलर पर्यायांचा समावेश आहे.

BYD-Eto 3 इलेक्ट्रिक कारची किंमत

नवीन इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत ३३.९९ लाख रुपये आहे. BYD-Eto 3 इलेक्ट्रिक-SUV ही BYD इंडिया डीलरशिप शोरूममध्ये ऑफर केली जाईल आणि ग्राहक कोणत्याही BYD इंडिया डीलरशिपवर वाहन बुक करू शकतात. वाहन बुकिंगसाठी ग्राहक BYD ऑटो इंडियाच्या http://www.bydautoindia.com या वेबसाइटला भेट देऊ शकतात. BYD-Eto 3 च्या वितरणाची पहिली बॅच जानेवारी २०२३ मध्ये सुरू होईल.