BYD India: वारेन बफेट समर्थित चीनी बहुराष्ट्रीय ऑटोमेकर BYD ऑटोच्या भारतीय उपकंपनीने अलीकडेच घोषणा केली आहे की त्यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित ऑल-इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट SUV BYD Atto 3 चे वितरण सुरू केले आहे. कंपनीने सर्व ३४० युनिट्स वितरित केल्याचे जाहीर केले. BYD नुसार, त्याच्या स्थापनेपासून फक्त ११ महिन्यांत, फर्मने विविध देश आणि प्रदेशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर २५२,२५१ BYD ATTO 3 युनिट्स पाठवले आहेत. जर आपण जानेवारी 2023 च्या आकडेवारीवर नजर टाकली तर, जागतिक स्तरावर Atto 3 च्या २३ हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. Atto 3 ही BYD ची सर्वात जलद विक्री होणारी कार बनली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BYD Atto3 इलेक्ट्रिक कारचे फीचर्स

या कारमध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले आहेत. यातच ५-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, १२.८-इंच रोटेटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto आणि Apple CarPlay साठी सपोर्ट, ४-वे अॅडजस्टेबल फ्रंट पॅसेंजर सीट, ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर हीटेड सीट, सीट बेल्ट रिमाइंडर सिस्टम, ६-वे सारखे फीचर्स यात ग्राहकांना मिळणार.

(हे ही वाचा : देशातील बाजारपेठेत ‘या’ इलेक्ट्रिक कारला पसंती; खरेदीसाठी लोकांची गर्दी, ‘या’ दिवशी होणार डिलिव्हरी सुरू)

याशिवाय यात पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, हिल डिसेंट कंट्रोल, सहा एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ३६० डिग्री कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, पीएम २.५ एअर फिल्टर, सिंथेटिक लेदर सीट्स, वायरलेस फोन चार्जिंग, पॅनोरामिक सनरूफ, रिअर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक, स्पीड अलर्ट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशनसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, लेव्हल २ ADAS सिस्टम, माउंटेड कंट्रोल्ससह फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग यांसारखे फीचर्स ही यात देण्यात आलेले आहे.

किती मिळणार रेंज? 

ही कार ५० मिनिटांत ० टक्के ते ८० टक्के पर्यंत जलद चार्जिंगला सपोर्ट करते. ARAI चाचणीनुसार ६०.४८ kWh च्या उच्च बॅटरी क्षमतेसह ही कार ५२१ किमी पर्यंतचा प्रवास करू शकते. कंपनीचा दावा आहे की, ही एसयूव्ही ७.३ सेकंदात ०-१०० किमी/ताशी वेग पकडू शकते. BYD Atto3 चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात बोल्डर ग्रे, पार्कौर रेड, स्की व्हाईट आणि सर्फ ब्लू कलर पर्यायांचा समावेश आहे.

(हे ही वाचा : Steel Wheel की Alloy Wheel तुमच्या कारसाठी कोणती चाके फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर माहिती )

BYD Atto3 किंमत

Atto 3 प्रीमियम SUV श्रेणीत येते. कंपनीने Atto 3 चे Forest Green Limited Edition देखील भारतात लाँच केले आहे. ही कार ३२.४९ लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. 

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Byd india delivered over 340 units of the atto 3 electric suv in january 2023 pdb
First published on: 08-02-2023 at 17:13 IST