scorecardresearch

फक्त ६० हजारात घरी न्या Maruti SPresso VXI CNG कार, आर्थिक मंदीमध्ये सुद्धा बेस्ट ऑप्शन; बघा EMI किती?

जर तुम्हीही पेट्रोल-डिझेलमुळे वैतागले असाल आणि तुमच्या फॅमिलीसाठी परवडणारी सीएनजी कार शोधत असाल तर तुम्ही सर्वात जास्त मायलेज देणारी शानदार Maruti SPresso VXI CNG कार खरेदी करू शकता.

Maruti-S-Presso-2
(फोटो- MARUTI)

कार क्षेत्रात अलीकडच्या काळात मिनी एसयूव्ही कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे ऑटोमेकर्सनी त्यांच्या मायक्रो एसयूव्ही लाँच करण्यास सुरुवात केली आहे, मायक्रो SUV असलेली आणि आकर्षक डिझाइन असलेल्या मारुती एस प्रेसोबद्दल आम्ही बोलत आहोत.

जर तुम्ही मारुती एस प्रेसो खरेदी करायची असेल तर तुम्हाला यासाठी ३.७८ लाख ते ५.४३ लाख रुपये खर्च करावे लागतील, परंतु हा प्लॅन वाचल्यानंतर तुम्ही ही कार अगदी सहज डाउन पेमेंटसह घरी घेऊन जाऊ शकता.

कार सेक्टरबाबत माहिती देणारी वेबसाइट CARDEKHO वर दिलेल्या डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही मारुती एस प्रेसोचाी VXI ऑप्शनल CNG व्हेरिएंट विकत घेतली तर कंपनीशी संबंधित बँक त्यावर ३,५५,१८७ रुपये कर्ज देईल.

या कर्जानंतर, तुम्हाला किमान ६०,५९९ रुपये डाउन पेमेंट करावं लागेल आणि त्यानंतर दरमहा ११,५२५ रुपये मासिक EMI भरावं लागेल.

आणखी वाचा : ओकायाच्या नव्या ई-स्कूटरसाठी बुकिंग सुरू, 200km ची रेंज, 70kmph ची टॉप स्पीड आणि बरंच काही…

या कारवरील कर्जाचा कालावधी बँकेने ६० महिन्यांसाठी निश्चित केला आहे आणि बँक कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के दराने व्याज आकारेल.

हा डाउन पेमेंट प्लॅन वाचल्यानंतर तुम्हाला ही मारुती एस प्रेसो खरेदी करायची असेल, तर या मायक्रो एसयूव्हीची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

मारुती एस प्रेसोच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचं झाल्यास, कंपनीने यामध्ये ९९८ सीसी इंजिन दिले आहे जे ५८.३३ बीएचपी पॉवर आणि ७८ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते आणि या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

आणखी वाचा : Wow! फक्त ३० हजारात खरेदी करा Honda Activa, एक वर्षाची वॉरंटी, 60 kmpl ची मायलेज

कारच्या फिचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यात मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर-अॅडजस्टेबल बाह्य मागील दृश्य मिरर, ७ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टॉप स्टार्ट बटण, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, अलॉय व्हील्स यांसारखी फिचर्स आहेत.

कारच्या मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही मारुती एस प्रेसो कार पेट्रोलवर २१.४ kmpl चा मायलेज देते. पण हे मायलेज तिच्या CNG व्हेरिएंटमध्ये ३१.२ kmpl पर्यंत वाढते.

(महत्त्वाची माहिती: मारुती एस प्रेसो VXI पर्यायी CNG वर उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट आणि व्याजदरांची योजना तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून असते, जी नकारात्मक अहवालाच्या बाबतीत बँक बदलू शकते.)

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2022 at 18:28 IST