एका सरकारी निर्णयामुळे वाहन खरेदी महागणार! १ जूनपासून लागू होणार नवे दर; जाणून घ्या कितीने वाढणार कार, बाईक्सची किंमत

Third Party Insurance Premium Hike: सरकारने यासंदर्भातील निर्देश जारी केले असून याचा भार थेट ग्राहकांवर येणार आहे

Bike Car Price Increases from 1 June
Third Party Insurance Premium Hike : एक जूनपासून लागू होणार नवे दर (फाइल फोटो)

Car- Bike Price Increases : केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने थर्ड पार्टी विम्याच्या प्रिमियममध्ये वाढ होणार असल्यासंदर्भातील पत्रक जारी केलं आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये ही वाढ १ जूनपासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय विमा नियमाक आणि विकास महामंडळाऐवजी (आयआरडीआय) मंत्रालयाकडून यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आलंय. आयआरडीआय ही देशातील विमासंदर्भातील नियमनाचं काम करते. या नव्या नियमामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचं वाहनखरेदीचं स्वप्नापर्यंतचा प्रवासही अधिक खडतर होणार आहे.

थर्ड पार्टी विम्यामध्ये वाढ झाल्याने देशातील वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या किंमती या निर्णयामुळे वाढणार असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा अधिक खाली होणार आहे. सध्या भारतीय वाहन उद्योगासमोर आधी मायक्रोचीपचा तुटवडा आणि कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत असल्याचे अनेक प्रश्न उभे असतानाच या निर्णयामुळे वाहनखरेदी करणाऱ्या ग्राहकसंख्येवर परिणाम होण्याची भीती वाहन उद्योजकांना आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार प्रमियम मोटरसायकच्या विम्यामध्ये १५ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. मात्र ही वाढ १५० सीसी पेक्षा अधिक इंजिन क्षमता असणाऱ्या गाड्यांना लागू होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बजाज पल्सर, केटीएम आरसी ३९०, रॉयल एनफिल्ड बुलेट आणि याच क्षमतेच्या गाड्यांच्या समावेश होतो. मध्यम वर्गीयांसाठी चिंतेची बाब म्हणजे भारतामध्ये यापुढे कोणत्याही राज्यात दुचाकी घ्यायची असेल तर १७ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. आधीच वाहननिर्मिती कंपन्यांनी दरवाढ केली असून त्यात आता या नवीन नियमामुळे वाहने अधिक महाग होणार आहेत.

खासगी गाड्यांबद्दल बोलायचं झाल्यास १००० ते १५०० सीसी क्षमतेची इंजिन असणाऱ्या गाड्यांच्या थर्डपार्टी प्रमियममध्ये सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. आधीच गाड्यांच्या किंमती वाहननिर्मिती कंपन्यांनी वाढवल्याने त्या महाग झाल्या असून त्यात आता या अतिरिक्त सहा टक्क्यांचा भार थेट ग्राहकांवर पडणार आहे.१००० सीसी इंजिन असणाऱ्या नवीन गाड्यांसाठी थर्ड पार्टी विम्याची रक्कम २३ टक्क्यांनी वाढणार आहे. तर १००० ते १५०० सीसी क्षमतेच्या इंजिनच्या गाड्यांवरील प्रिमियममध्ये ११ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

या वर्षाच्या सुरुवातीलाच मारुती सुझुकी, टोयोटा, महेंद्रा, टाटा या कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किंमतींमध्ये वाढ केली. कच्च्या मालाचा पुरवठ्याला करोनामुळे फटका बसल्याने गाड्यांच्या किंमती वाढवण्यात आल्यात. याचदरम्यान दुचाकी बाजारातील वाहननिर्मिती कंपन्यांनीही गाड्यांच्या किंमती वाढवल्यात.

कितीने वाढणार विमा

प्रिमियम दुचाकी (१५० सीसीच्या वरील क्षमता असणाऱ्या) – १५ टक्क्यांनी वाढ
कार (१००० ते १५०० सीसी क्षमता असणाऱ्या) – ६ टक्क्यांनी वाढ
कार (१००० सीसीपर्यंत क्षमता असणाऱ्या) – २३ टक्क्यांनी वाढ
स्कुटर्स आणि मोटरसायकल (१५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या) – १७ टक्क्यांनी वाढ

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Car bike price increases from 1st june govt announces third party insurance premium hike scsg

Next Story
Petrol-Diesel Rate Today : इंधनांच्या दरात तेजी; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची आजची किंमत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी