Bajaj Discover 150 Offer : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील मोटारसायकल सेगमेंटमध्ये सर्वाधिक मायलेज असलेल्या बजेट बाइक्सची मोठी रेंज आहे, यात बजाज, हिरो, टीव्हीएस आणि होंडा यासारख्या कंपन्यांच्या बाइक्सची संख्या सर्वाधिक आहे.

जर तुम्हाला सर्वाधिक मायलेज असलेली बाईक घ्यायची असेल, परंतु तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही बजाज डिस्कव्हर 150 वर उपलब्ध असलेल्या या ऑफरचे डिटेल्स जाणून घेऊ शकता.

आणखी वाचा : आता वीज बिल भरण्यासाठी रांगेत उभं रहावं लागणार नाही, घरबसल्या फक्त दोन मिनिटांत भरा, जाणून घ्या

जर तुम्ही ही बजाज डिस्कव्हर शोरूममधून खरेदी केली तर यासाठी तुम्हाला ५४,५२० ते ५७,६३० रुपये खर्च करावे लागतील, परंतु या कंपनीच्या ऑफरमुळे तुम्ही ही बाईक फक्त २१ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकाल.

बजाज डिस्कव्हर 150 वर आजची ऑफर BIKES24 ने दिली आहे, याची एक पोस्ट त्यांनी आपल्या साइटवर पोस्ट केली आहे आणि तिची किंमत फक्त २१ हजार रुपये आहे.

वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या बाईकचे मॉडेल २०११ चे असून ती आतापर्यंत ३० किलोमीटर धावली आहे. या बजाज डिस्कव्हर 150 ची फर्स्ट ओनरशीप आहे आणि त्याची नोंदणी DL 08 RTO कार्यालय, दिल्ली येथे आहे.

आणखी वाचा : Airtel, Jio आणि Vi चे ५०० रुपयांच्या आतील हे बेस्ट रिचार्ज प्लॅन, ८४ दिवसांची वैधता आणि बरंच काही…

Bikes24 काही अटींसह या बाइकच्या खरेदीवर एक वर्षाची वॉरंटी योजना देत आहे, तसेच सात दिवसांच्या मनी बॅक गॅरंटी योजना सुद्धा देण्यात येत आहे. या मनी बॅक गॅरंटी योजनेनुसार, जर तुम्ही ही बाईक खरेदी केली आणि तुम्हाला ती सात दिवसांच्या आत आवडली नाही, तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता ज्यानंतर कंपनी तुमचे पेमेंट परत करेल.

तुम्हाला ही बाईक घ्यायची असेल, तर या ऑफरनंतर या बाईकचे स्पेसिफिकेशन आणि मायलेजचे संपूर्ण डिटेल्स वाचा.

आणखी वाचा : धुमाकूळ घालायला आला OPPO चा सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोन, डिझाइन आणि फिचर्स पाहून लोक वेडावून गेले; किंमत जाणून घ्या

बजाज डिस्कव्हर 150 च्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचं झाल्यास, यात 144.8 cc सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे जे 14.3 PS ची पॉवर आणि 12.75 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 72 किलोमीटर प्रति लीटर एवढा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car bike second hand bajaj discover 150 in 21 thousand with guarantee and warranty plan read full details prp
First published on: 10-01-2022 at 21:00 IST