scorecardresearch

शानदार ऑफर! फक्त 33 हजारात घरी न्या १ लाखाची दमदार बजाज पल्सर 180

तुम्ही जर बाईक घेण्याचा विचार करत असाल आणि कमी बजेटमुळे तुम्हाला अडचणी येत असतील, ही ऑफर एकदा नक्की वाचा.

Bajaj-Pulsar-180
(फोटो- BIKES24)

तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल.

टू व्हीलर सेक्टरमध्ये मायलेज देणाऱ्या बाइक्सनंतर वेगवान स्पोर्ट्स बाइक्सना प्राधान्य दिलं जाते, ज्यामध्ये बजाज, टीव्हीएस, सुझुकी आणि होंडा यांसारख्या कंपन्यांच्या बाइक्स सर्वाधिक आहेत, यापैकी एक असलेली बजाज पल्सर 180 बद्दल आज आम्ही तुम्हाला एका ऑफरबाबत माहिती देत आहोत.

जर तुम्ही ही बाईक विकत घेतली तर तुम्हाला यासाठी १.१६ लाख रुपये खर्च करावे लागतील, परंतु या ऑफरद्वारे तुम्ही ही बाईक अर्ध्याहून कमी किमतीत घरी घेऊन जाऊ शकता.

या बजाज पल्सर 180 वर आजची ऑफर सेकंड हँड टू व्हीलर खरेदी करणार्‍या वेबसाइट BIKES24 ने दिली आहे. याची जाहिरात त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर पोस्ट केली आहे. या ऑफरमधून तुम्ही ही १ लाखाची बाईक केवळ ३३ हजार रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता.
वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या बजाज पल्सर 180 चे मॉडेल २०१४ चे आहे आणि त्याने आतापर्यंत ५१,९७२ किमी अंतर कापले आहे. या बजाज पल्सर 180 ची मालकी सेकंड ओनरशीपची आहे आणि त्याची नोंदणी डीएल 09 आरटीओ कार्यालय, दिल्ली येथे नोंदणीकृत आहे.

ही बाईक खरेदी केल्यावर, कंपनी काही अटींसह एक वर्षाची वॉरंटी योजना, सात दिवसांच्या मनी बॅक गॅरंटी प्लॅनसह देत आहे. या मनी बॅक गॅरंटी योजनेनुसार, खरेदी केल्यानंतर सात दिवसांच्या आत या बाईकमध्ये काही दोष आढळल्यास किंवा तुम्हाला ही बाईक आवडली नसेल, तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता. बाईक परत केल्यानंतर, कंपनी कोणतेही प्रश्न किंवा कपात न करता तुमचे संपूर्ण पेमेंट तुम्हाला परत करेल.

आणखी वाचा : लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार Simple One इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या डिलिव्हरीची तारीख

बजाज पल्सर 180 वर उपलब्ध ऑफर वाचल्यानंतर, जर तुम्ही ही बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर या बाईकची फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

आणखी वाचा : फक्त ६० हजारात घरी न्या Maruti SPresso VXI CNG कार, आर्थिक मंदीमध्ये सुद्धा बेस्ट ऑप्शन; बघा EMI किती?

बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने १७८.६ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १७.०२ PS पॉवर आणि १४.५२ Nm पीक टॉर्क जनरेट करते, जे 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाईक ४७ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Car bike second hand bajaj pulsar 180 in 33 thousand with 1 year warranty and money back guarantee plan prp

ताज्या बातम्या