scorecardresearch

मस्तच! अवघ्या ३ लाखांमध्ये खरेदी करा महिंद्रा KUV 100, जाणून घ्या सविस्तर ऑफर

तुम्हालाही मायक्रो एसयूव्ही खरेदी करायची असेल, परंतु कमी बजेटमुळे ती खरेदी करता आली नाही, तर महिंद्र KUV100 वर उपलब्ध ऑफर्सची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

Mahindra-KUV100
(फोटो- CARDEKHO)

तुम्हालाही मायक्रो एसयूव्ही खरेदी करायची असेल, परंतु कमी बजेटमुळे ती खरेदी करता आली नाही, तर महिंद्र KUV100 वर उपलब्ध ऑफर्सची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

जर तुम्ही शोरूममधून ही SUV खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ४.५६ लाख ते ७.२७ लाख रुपये खर्च करावे लागतील, परंतु येथे या ऑफरद्वारे तुम्ही ही SUV फक्त ३ लाखांच्या बजेटमध्ये आकर्षक फायद्यांसह घरपोच घेऊ शकता.

महिंद्रा KUV100 वरील आजची ऑफर कार क्षेत्रातील माहिती देणारी वेबसाइट CAR DEKHO कडून आली आहे. 3,50,000 रुपयांमध्ये ही एसयूव्ही खरेदी करू शकता.

वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या कारचे मॉडेल जुलै २०१७ मधलं आहे आणि आतापर्यंत ती ८१,७४६ किमी धावली आहे. या महिंद्रा KUV 100 ची मालकी फर्स्ट ओनरशीप आहे आणि त्याची नोंदणी DL 10 RTO कार्यालय, दिल्ली येथे आहे.

आणखी वाचा : शानदार ऑफर! फक्त 33 हजारात घरी न्या १ लाखाची दमदार बजाज पल्सर 180

ही SUV खरेदी केल्यावर, कंपनी काही अटींसह सहा महिन्यांची वॉरंटी योजना, सात दिवसांच्या मनी बॅक गॅरंटी प्लॅनसह देत आहे. या मनी बॅक गॅरंटी योजनेनुसार, जर तुम्ही कार खरेदी केली आणि त्यात सात दिवसांच्या आत काही दोष आढळला किंवा तुम्हाला कार आवडत नसेल तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता.

कार परत केल्यानंतर, कंपनी तुमच्याद्वारे केलेल्या पेमेंटमध्ये कोणतीही कपात न करता तुम्हाला संपूर्ण पेमेंट परत करेल. याशिवाय, कंपनी सहा महिन्यांच्या पॅन इंडिया रोड साइड असिस्टन्स प्लॅन आणि विनामूल्य आरसी हस्तांतरणाचा लाभ देखील देत आहे.

आणखी वाचा : लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार Simple One इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या डिलिव्हरीची तारीख

ज्यांचे बजेट कमी आहे किंवा त्यांना ही कार लोनवर घ्यायची आहे, त्यांच्यासाठी कंपनी आकर्षक कर्ज सुविधेचा लाभही देत ​​आहे. याशिवाय, कंपनी ५००० रुपयांचे शिपिंग चार्ज माफ करेल आणि सुमारे ५००० रुपयांचा विनामूल्य थर्ड पार्टी इन्शुरन्स देखील देईल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Car bike second hand mahindra kuv 100 in 3 lakh budget with loan guarantee and money back guarantee plan prp

ताज्या बातम्या