Driving monsoon tips: पाऊस कुणासाठी आनंद घेऊन येतो तर काहींना दुःख देऊन जातो. पावसाळ्यात रस्ते धोकादायक बनतात. पण, या मोसमात बाईक राईडची मजा घेण्याचा आनंद काही वेगळाच आहे. योग्य काळजी घेऊन तुम्हीही पावसात बाईक राईडचा आनंद घेऊ शकता. जास्त पावसामुळे अपघाताची शक्यता वाढते, याशिवाय वाहनांच्या नुकसानीची शक्यताही वाढते. अशा परिस्थितीत, येत्या पावसाळ्यात आपल्याला आपली बाईक कशी सुरक्षित ठेवता येईल आणि वापरण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या टिप्स आहेत. आपण पाच महत्त्वाच्या टिप्स फॉलो करून आपल्या बाईकची काळजी घेऊ शकता आणि तुमची राईड आनंदाची बनवू शकता.

टायरची स्थिती : पावसाळ्यात राईडला बाहेर जाण्यापूर्वी महत्त्वाचे म्हणजे आपल्या टायर्सची तपासणी करा. जर ते बरेच जुने झाले असतील तर त्यांना बदलणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या वाहनाचा नेहमी वापर करत असाल तर गाडीचे टायर्स गुळगुळीत होतात. जर तुमच्या गाडीचे टायर्स गुळगुळीत झाले असतील तर ते आत्ताच बदलून घ्या. तसेच टायर्समध्ये 3mm थ्रेड्स असले पाहिजेत. कारण अशा टायर्सची रोडवर ग्रिप चांगली असते. तसेच टायर्समध्ये पुरेशी हवा असली पाहिजे. टायर्समध्ये हवा कमी असेल तर टायर पंक्चर होण्याचे चान्सेस जास्त असतात. टायर्समध्ये हवा कमी असेल तर इंजिनवर प्रेशर येऊन कारचं मायलेजदेखील कमी होतं.

टायरचा दाब : बाइकच्या पुढील टायरमधील हवेच्या दाबाची श्रेणी 22 PSI ते 29 PSI असू शकते. त्याचप्रमाणे मागील टायरमधील हवेचा दाब 30 PSI ते 35 PSI पर्यंत असू शकतो. मागील बाजूस जास्त हवा ठेवली जाते, कारण (Causes) ती अधिक लोड केली जाते. वेगवेगळ्या परिस्थितींनुसार हवेचा दाब 2 ते 4 बिंदूंनी वर-खाली होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या बाइकच्या हवेच्या सेवनाबाबत अजूनही गोंधळलेले असाल, तर बाइकसोबत येणाऱ्या मॅन्युअल बुकमध्ये ते तपासणे चांगले.

चांगले बूट परिधान करा : चांगले बूट ही पावसात अनेकदा दुर्लक्षित केलेली बाब आहे. कोरडे पाय तुम्हाला बाइकवर आरामदायी प्रवासासाठी आवश्यक आहेत, त्यामुळे वॉटरप्रूफ बुटांची चांगली जोडी खरेदी करणे गरजेचे आहे.

हेडलाईट चेक करा : पावसाच्या थेंबामुळे बहुतेकदा आपला प्रवास सुखद होण्याऐवजी त्रासदायक ठरू शकतो. म्हणूनच जर आपल्या वाहनाची हेडलाईट चांगली असेल तर आपल्याला पावसाळ्यात कुठेही अंधारात जाताना काही अडचण उद्भवणार नाही आणि काही मीटर अंतरापर्यंत अगदी स्पष्ट दिसेल.

हेही वाचा >> Yamaha Fascino S : यमाहाने लाँच केली भन्नाट स्कूटर; बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फिचर्स, किंमत १ लाखांहून कमी

उत्तम नियंत्रण : ओल्या रस्त्यावर अचानक जोरदारपणे ब्रेक दाबू नका किंवा बाइक जास्त स्पीडमध्ये चालवू नका, ज्यामुळे कोणताही अपघात होऊ शकतो. पावसाळ्यात वाहन चालवताना त्याचा वेग मर्यादित असायला हवा. महामार्गावर तुमच्या वाहनांचा वेग 80kmph पेक्षा जास्त नसावा. तुम्ही जर कमी वेगाने वाहन चालवत असाल तर ते तुमच्या नियंत्रणात असतं. त्यामुळे वाहन घसरण्याचा आणि अपघाताचा धोका नसतो. ड्रायव्हिंग करताना अचानक एक्सलेटर वाढवू नका, पटकन ब्रेक लावू नका. ब्रेक हळू हळू लावा जेणेकरून वाहन स्लिप होणार नाही.