scorecardresearch

कारमधील टचस्क्रीनवर स्क्रॅच पडले आहेत का? त्यावर करा हे सोपे उपाय

कारमधील टचस्क्रीनवरील स्क्रॅच घालवण्यासाठी काय करता येईल जाणून घ्या

कारमधील टचस्क्रीनवर स्क्रॅच पडले आहेत का? त्यावर करा हे सोपे उपाय
कारमधील टचस्क्रीनवरील स्क्रॅचपासून सुटका मिळवण्यासाठीचे उपाय (फोटो: Freepik)

सर्व आधुनिक गाड्यांमध्ये सिस्टिम वापरण्यासाठी टचस्क्रीन सुविधा उपलब्ध असते. त्याचा वापर करताना अनेकदा त्यावर स्क्रॅच पडतात. मग हे स्क्रॅच काढण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. यासाठी काही अयोग्य पर्याय निवडले तर सिस्टिम खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य पद्धतीने हे स्क्रॅच काढावे. त्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील जाणून घ्या.

टूथपेस्ट
कारवरील टचस्क्रीनवरील स्क्रॅच काढण्यासाठी टूथपेस्ट फायदेशीर ठरू शकते. यासाठी एक मऊ कापड किंवा कापसाचा बोळा घ्या. त्यानंतर कापडावर किंवा बोळ्यावर थोडी टूथपेस्ट लावून ते स्क्रीनवर हळुवार लावा. थोड्याच टूथपेस्टचा वापर करा आणि जास्त जोर देऊन स्क्रीनवर घासू नका. त्यानंतर स्वच्छ कापडाने स्क्रिन स्वच्छ करा.

आणखी वाचा: फक्त ८० हजारात घरी आणा ‘ही’ लोकप्रिय कार; जाणून घ्या काय आहे फायनान्स प्लॅन…

बेकिंग पावडर
बेकिंग पावडरचा वापर करूनही टचस्क्रीनवरील स्क्रॅच काढता येतात. थोडे पाणी घेऊन त्यात बेकिंग पावडर टाका त्याची पेस्ट बनेपर्यंत ते नीट मिसळून घ्या. एक मऊ कापड घेऊन ते पेस्टमध्ये बुडवून स्क्रिनवर चोळा, यामुळे स्क्रीनवरील स्क्रॅच निघण्यास मदत होईल. त्यानंतर स्वच्छ कापड घेऊन ही पेस्ट स्क्रिनवरून स्वच्छ करा.

तेल
स्क्रिनवरील लहान स्क्रॅचेस लगेच दिसून येत नाहीत पण ते स्क्रिनला डॅमेज करू शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी भाज्यांचे तेल वापरता येईल. भाज्यांचे तेल कापडावार घेऊन ते स्क्रीनवर हळुवार चोळा. जास्त थंड किंवा गरम तेल वापरु नका, साधारण तेल वापरा.

आणखी वाचा: आर्मी टॅंकसारखा लूक, निवडणूक प्रचार अन्…; पवन कल्याण यांची खास गाडी पाहिली का?

स्क्रॅच एलीमीनेशन क्रिम
स्क्रॅच एलीमीनेशन क्रिम वापरून तुम्ही स्क्रॅचेस पासून लगेच सुटका मिळवू शकता. ही क्रिम लावण्यासाठीही मऊ कापड वापरुन हळुवारपणे ते स्क्रिनवार चोळा.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 19:48 IST

संबंधित बातम्या