Premium

Car Sales in May 2023: मे महिन्यात कारच्या विक्रीत विक्रमी वाढ, ‘या’ कंपनीने विकल्या सर्वात जास्त गाड्या

आज आपण काही कार कंपन्यांच्या विक्रीविषयी जाणून घेणार आहोत.

Car Sales in May 2023
(फोटो : Financial Express )

मे महिन्यात कार कंपन्यांनी विक्रीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. Maruti Suzuki कंपनीने वाहनांच्या विक्रीत दहा टक्के वाढ नोंदवली आहे. याशिवाय Bajaj Auto, kia, Hyundai कंपनीच्या विक्रीतही वाढ दिसून आली आहे. Financial Expressने दिलेल्या वृत्तानुसार मे महिना कार कंपन्यांसाठी खूप फायदेशीर ठरला आहे. आज आपण काही कार कंपन्यांच्या विक्रीविषयी जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किआ (Kia)

किआ (Kia) कंपनीने गुरुवारी सांगितले की मे महिन्यात कंपनीच्या वाहन विक्रीमध्ये तीन टक्के वाढ नोंदवली आहे. यात किआच्या सोनेट मॉडेलची विक्री सर्वाधिक आहे.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 2 June: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, पाहा तुमच्या शहरातील भाव

मारुती सुझुकी (Maruti Suzuki)

देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki India) ने मे महिन्यातील कंपनीच्या विक्रीचा रिपोर्ट सादर केला आहे. मे महिन्यात कंपनीच्या विक्रीमध्ये दहा टक्के वाढ दिसून आली आहे.

टाटा मोटर्स (Tata Motors)

टाटा मोटर्स कंपनीची मे महिन्यातील एकूण विक्री १.६२ टक्क्यांनी घसरली आहे. कंपनीने मागच्या वर्षी मे महिन्यात ७६,२१० वाहनांची विक्री केली होती. कंपनीने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी मे महिन्यात ७३,४४८ वाहनांची विक्री केली आहे.

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा (Mahindra and Mahindra)

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीच्या वाहन विक्रीमध्ये २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मे २०२२ मध्ये कंपनीने २६,९०४ वाहनांची विक्री केली होती तर या वर्षी मे महिन्यात ३२,८८३ वाहनांची विक्री करण्यात आली आहे.

हेही वाचा : Traffic Challan : आपल्या वाहनावर चलन प्रलंबित आहे का हे कसं तपासावं? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Hyundai

Hyundai कंपनीच्या विक्रीमध्ये मे महिन्यात १६.२६ टक्के वाढ झाली आहे. २०२२ च्या मे महिन्यात कंपनीने ५१,२६३ वाहनांची विक्री केली होती तर आता या वर्षी मे महिन्यात कंपनीने ५९,६०१ वाहनांची विक्री केली आहे.

बजाज ऑटो (Bajaj Auto)

बजाज ऑटोच्या विक्रीमध्ये २९ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने मे २०२२ मध्ये एकूण २,७५,८६८ वाहनांची विक्री केली होती तर या वर्षी मे महिन्यातील विक्रीचा आकडा हा ३,०७,६९६ इतका आहे.

एमजी मोटर (MG Motor)
एमजी मोटर इंडिया कंपनीच्या विक्रीमध्ये मे महिन्यात २५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने मे महिन्यात २०२२ मध्ये ४,००८ वाहनांची विक्री केली होती तर या वर्षी मे महिन्यात हा आकडा ५,००६ इतका आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 15:18 IST
Next Story
Petrol-Diesel Price on 2 June: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, पाहा तुमच्या शहरातील भाव