scorecardresearch

Auto Sales January 2023: जानेवारीमध्ये ‘या’ कारची सर्वाधिक विक्री, Maruti पुन्हा बनली नंबर वन

Maruti Suzuki Car: देशभरात मारुतीच्या वाहनांना प्रचंड मागणी आहे. वाहन विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

Maruti Suzuki Car Sales
मारुती सुझुकी वाहन विक्रीत वाढ (Photo-financialexpress)

Maruti Suzuki Car Sales Report January 2023: मारुती सुझुकी जानेवारीमध्ये देशातील कार विक्री करणारी नंबर वन कंपनी बनली आहे. वाहन क्षेत्रातील, प्रमुख कार उत्पादक मारुती सुझुकी, महिंद्रा आणि महिंद्रा आणि टाटा मोटर्स यांनी जानेवारी २०२३ मध्ये त्यांच्या कार विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. या आकडेवारीनुसार, मारुती सुझुकी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत जानेवारी महिन्यात सर्वोत्तम कार विक्री करणारी कंपनी म्हणून उदयास आली आहे.

Maruti Suzuki Cars Sales Report January 2023

२०२३च्या पहिल्या महिन्यात, मारुती सुझुकी इंडियाने १,७२,५३५ कारच्या विक्रीसह १२ टक्के वाढ केली आहे. मारुती सुझुकीच्या जानेवारी २०२२ च्या विक्रीवर नजर टाकल्यास, कंपनीने या कालावधीत १,५४,३७९ कार विकल्या. मारुती सुझुकीने जानेवारीमध्ये विकल्या गेलेल्या १,३६,४४२ वरून प्रवासी वाहनांची संख्या १,५५,१४२ पर्यंत वाढली आहे. त्यानुसार, कंपनीने या विभागात १४ टक्के वाढ साधली आहे.

(हे ही वाचा : Auto Sales January 2023: टाटा मोटर्सच्या ‘या’ शानदार कारच्या मागे लागले भारतीय, विक्रीत केली रेकॉर्डब्रेक कामगिरी )

‘या’ कारची सर्वाधिक विक्री

मायक्रो सेगमेंट ऑटोमोबाईल सेगमेंट ज्यामध्ये अल्टो आणि एस-प्रेसोचा समावेश आहे. डिसेंबर २०२२ मध्ये मागील महिन्यात १८,६३४ युनिट्सवरून २५,४४६ युनिट्सपर्यंत वाढ झाली. याशिवाय कॉम्पॅक्ट कार विक्रीमध्ये बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस, स्विफ्ट, टूर एस आणि वॅगनआर यांचा समावेश आहे. जानेवारी २०२२ मध्ये, कंपनीने ७१,४७२ कार विकल्या, ज्यात या महिन्यात ७३,८४० पर्यंत वाढ झाली आहे. ब्रेझा, एर्टिगा, एस-क्रॉस आणि XL6 युटिलिटी वाहनांच्या विक्रीतही जानेवारी २०२३ मध्ये वाढ झाली आहे, जी मागील महिन्यात २६,६२४ वरून ३५,३५३ पर्यंत वाढली आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 17:23 IST