Car start tips: कार सुरू करताना काही लहान, पण महत्त्वाच्या सवयी इंजिन दीर्घकाळ उत्तम राहण्यासाठी मदत करतात. यासाठी कार सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी तुम्ही सवयीने केल्याच पाहिजेत. खाली दिलेल्या गोष्टी तुम्ही ४० सेकंदात करू शकता, ज्यामुळे तुमच्या कारचे इंजिन वर्षानुवर्षे चांगले राहील.

इंजिन सुरू करण्यापूर्वी कारचे इग्निशन चालू करा, परंतु लगेच स्टार्ट बटण दाबू नका. इंधन पंप आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम सुरू होण्यासाठी काही सेकंद प्रतीक्षा करा.

हेही वाचा… Kia launches Sonet Gravity: गणेशोत्सवात कार घ्यायचीय? KIAने केली सोनेट ग्रॅव्हिटी लॉंच, किंमत वाचून व्हाल थक्क

ऑईल फ्लोची काळजी घ्या: कार सुरू केल्यानंतर सुमारे १०-२० सेकंदांसाठी तिला हळूवार चालवा. यामुळे इंजिन ऑइल इंजिनच्या सर्व भागांमध्ये योग्यरित्या पोहोचते, ज्यामुळे घर्षण कमी होते.

एसी आणि इतर गोष्टी बंद ठेवा: कार सुरू करताना एसी, रेडिओ किंवा इतर गोष्टी बंद ठेवा, यामुळे बॅटरी आणि इंजिनवर अतिरिक्त दबाव पडत नाही.

RPM स्थिर राहू द्या: इंजिन सुरू केल्यानंतर, RPM ला स्थिर होऊ द्या. अचानक गती वाढल्याने इंजिनवर अनावश्यक भार पडू शकतो.

इंजिनचा आवाज ऐका: कार सुरू केल्यानंतर इंजिनचा आवाज काळजीपूर्वक ऐका. काही असामान्य आवाज असल्यास कार लगेच तपासा.

हेही वाचा… सणासुदीत स्वस्तात कार घ्यायचीय? Maruti Suzukiच्या ‘या’ गाड्या झाल्या स्वस्त, किंमत वाचून व्हाल थक्क

स्लो ड्रायव्हिंगने सुरू करा: इंजिनचे तापमान सामान्य होईपर्यंत कार हळू चालवा. अचानक फास्ट ड्राईव्ह केल्याने इंजिनवर अधिक भार पडतो.

बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टिमला वेळ द्या: कार सुरू होताच बॅटरी चार्ज होऊ लागते, त्यामुळे एसी किंवा हाय-लाइट्सचा वापर ताबडतोब टाळा.

गिअरचा योग्यरीत्या वापर करा: मॅन्युअल ट्रान्समिशन कारमध्ये, योग्य गिअरमध्ये गाडी चालवल्यास इंजिनवर अतिरिक्त ताण पडत नाही.

इंजिनचे तापमान तपासा: टेम्परेचर गेजचे निरीक्षण करा. इंजिन थंड किंवा खूप गरम होत असेल तर या दोन्ही परिस्थितींमध्ये समस्या उद्भवू शकतात.

इंधनाकडे लक्ष द्या: कार सुरू करण्यापूर्वी इंधनाची पातळी तपासा. कार कमी इंधनावर चालल्याने इंजिनवर अतिरिक्त दबाव पडतो.

हेही वाचा… Royal Enfield प्रेमींसाठी खुशखबर! तुमची आवडती Classic 350 नव्या लूकसह झाली लॉंच; किंमत एकदा पाहाच

या लहान-सहान सावधगिरीने इंजिनला दीर्घकाळ चांगल्या स्थितीत ठेवता येते आणि त्याचे आयुष्य वाढवण्यास मदत होते.