आठवड्याच्या सुट्टीला अनेक जण लांब फिरण्याचा योजना आखतात. दारात उभी असलेल्या गाडीची मोलाची साथ लाभते. मात्र अनेकदा फिरण्यासाठी गाडी बाहेर काढली की समस्या जाणवू लागतात. गाडी चालवताना कारचे इंजिन तापल्याने गाडी बंद पडण्याची शक्यता असते. कधी कधी अपघातही होऊ शकतो. भर रस्त्यात गाडीला आग लागण्याचे अनेक घटना आपण वाचल्या किंवा प्रत्यक्ष पाहिल्या असतील. गाडीची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषत: लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीची सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्ती करून घ्या. आज आम्‍ही तुम्‍हाला रेडिएटर फ्लशबद्दल सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेडिएटर फ्लश म्हणजे काय?
रेडिएटर फ्लशला कूलंट फ्लश असेही म्हणतात. कूलंट कारचे इंजिन थंड ठेवून अधिक कार्यक्षम बनवते. वास्तविक हे रसायनांचे मिश्रण आहे जे कार रेडिएटर स्वच्छ करते. हे स्केलिंग आणि गंज काढण्यासाठी देखील वापरले जाते.

कारसाठी रेडिएटर फ्लश का आवश्यक आहे?

  • कार इंजिन अधिक तापणं हे पहिले लक्षण म्हणजे रेडिएटर फ्लश. जर कूलंट पातळी शाबूत असूनही कार जास्त गरम होत असेल, तर कार दूषित कूलंटवर चालत आहे.
  • जर कूलंट लीक होत असेल तर तुम्हाला रेडिएटर फ्लश करणं आवश्यक आहे. कोणतीही गळती रेडिएटरमधील घाणीचे लक्षण आहे.
  • कूलंटचा रंग बदलल्यास रेडिएटर फ्लश करणं आवश्यक आहे.
  • इंजिनमधून आवाज येत असेल तर तुम्हाला रेडिएटर फ्लश करणं आवश्यक आहे. कूलंट काम करत नसल्याने इंजिनचं तापमान वाढतं आणि त्यातून आवाज येऊ लागतो.
  • इंजिनाभोवती दुर्गंधी येणे देखील चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ इंजिनच्या आत कूलंट गळत आहे.

तुम्हाला चार लाखाच्या बजेटमध्ये पाच सीटर नवी गाडी घ्यायची का?, हे आहेत पर्याय

रेडिएटर फ्लश किती फायदेशीर आहे?

  • रेडिएटर फ्लश न केल्यास वॉटर पंप निकामी होण्याची शक्यता आहे. जेव्हा कूलंट दूषित होते, तेव्हा त्याचे अवशेष पंप सीलवर जमा होतात आणि सीलिंगच्या पृष्ठभाग कोरडा होऊ लागतो. वॉटर पंप बियरिंग्जचे आयुष्य वाढवण्यासाठी कूलिंग सिस्टमचे फ्लशिंग आवश्यक आहे.
  • रेडिएटर फ्लश स्टेलिंग आणि गंज तसेच जुने अँटी-फ्रीझ अवशेष काढून टाकण्यास मदत करते. जर तुम्ही वेळोवेळी नियमित फ्लशिंग करत असाल तर कारची कूलिंग सिस्टीम चांगली राहते आणि इंजिन व्यवस्थित थंड ठेवते.
  • रेडिएटर फ्लश दूषित कूलंटमध्ये तयार होणारा फोम देखील काढून टाकतो. जर दूषित कूलंटमध्ये फेस तयार होऊ लागला, तर नवीन कूलंट जोडल्यानंतरही फोम तयार होण्याची शक्यता असते. या प्रकरणात रेडिएटर फ्लश फायदेशीर आहे.
More Stories onकारCar
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car tips know about the radiator flush to prevent car overheating rmt
First published on: 20-01-2022 at 09:17 IST