Car Tyre Maintenance Tips: आजकाल धावत्या कारचा टायर फुटल्याने मोठे अपघात होऊन लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या कानावर पडतात. आता नुकताच मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी एसयूव्हीचे पुढील उजवे चाक फुटल्याने एका अरुणकुमार पारेख या ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. टायर फुटल्यानंतर, वाहनाचे नियंत्रण सुटले, ते मध्यभागी जाऊन आदळले आणि मुंबईकडे जाणाऱ्या विरुद्धच्या लेनमध्ये ट्रकच्या डिझेल टाकीला धडकले. टायर फुटल्याने मोठा अपघात होऊन लोकांचा जीव गेल्याचं आपण पाहिलं आहे. त्यामुळे गाडीच्या टायर्सची काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया गाडीच्या टायर्सची कशी काळजी घ्याल…

‘अशी’ घ्या गाडीच्या टायर्सची काळजी

  • प्रत्येक गोष्टीचे वय असतं असं म्हणतात. तशाच प्रकारे टायरला देखील आहे. जसजसा वेळ जातो तसतसा टायर जड होतो. त्यामुळे टायरची लवचिकता आणि पकड प्रभावित होते. टायरचं आयुष्य तीन वर्ष किंवा ४० हजार किमीपर्यंत असते. सहा महिन्यांपेक्षा जुने टायर खेरदी करू नका.

(हे ही वाचा : देशात आलयं ‘हे’ भन्नाट डिव्हाइस, आता हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी चालवता येणार नाही! )

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?
  •  लांबच्या प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्या गाडीच्या टायर्सची तपासणी करणं गरजेचं आहे. यात योग्य एअर प्रेशर असणं गरजेचं आहे. मधेमधे गाडीचे टायर तपासणं गरजेचं आहे. जर टायरमध्ये कट किंवा फट असेल तर मॅकेनिकला दाखवा. जर टायर घासलेला असेल तर बदलणं गरजेचं आहे. 
  • टायरच्या रबरच्या कडकपणामुळे किंवा ट्रेडवर क्रॅकच्या खुणा असल्यामुळे टायरमध्ये घट देखील होते. गाडी कमी चालवल्यामुळे अनेकदा असं घडतं. या प्रकाराच्या टायरमुळे तुम्ही कमी वेगानं प्रवास करू शकतात. पण जर हायवेवर गाडी चालवायची असल्यास किंवा तुम्हाला वेगानं गाडी चालवायची आवड असल्यास टायर बदलणं गरजेच आहे.
  • कार ड्रायव्हिंग करण्याच्या पद्धतीनुसार कारचे मागचे किंवा पुढचे टायर्स कमी किंवा अधिक प्रमाणात घासले जातात. अशा वेळी टायर्सची अदलाबदली करायला हवी. जेणे करून सर्व टायर्स सम प्रमाणात घासले जातील आणि त्यांची साईज सारखीच राहील.