Cars recalled by Kia company | Loksatta

Kia ने भारतातील ४४ हजार १७४ कार्स मागवल्या परत; जाणून घ्या कारण…

दक्षिण कोरियाची आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी  Kia ने भारतातील ४४ हजार १७४ कार्स परत मागवल्या आहेत.

Kia ने भारतातील ४४ हजार १७४ कार्स मागवल्या परत; जाणून घ्या कारण…
Photo-financialexpress

दक्षिण कोरियाची आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी  Kia ने भारतातील ४४ हजार १७४ कार्स परत मागवल्या आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे ही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांगलाच धक्का बसला आहे.

कार्स परत बोलवण्याचे कारण

दक्षिण कोरियाच्या ऑटोमेकरने एका निवेदनात म्हटले आहे की, एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून, कंपनीने तपासणीसाठी वाहने स्वेच्छेने परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे आणि आवश्यक असल्यास, सॉफ्टवेअर अपडेट विनामूल्य प्रदान केले जाईल, असेही ऑटोमेकरने एका निवेदनात म्हटले आहे.

Kia India संबंधित वाहनांच्या मालकांशी थेट संपर्क साधून त्यांना या ऐच्छिक रिकॉल ड्राइव्हबद्दल अपडेट करेल. अपॉईंटमेंट शेड्यूल करण्यासाठी प्रभावित वाहनांच्या ग्राहकांना त्यांच्या संबंधित किआ अधिकृत डीलर्सशी संपर्क साधावा लागेल. या व्यतिरिक्त, ते Kia India च्या वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा Kia कॉल सेंटरशी संपर्क साधू शकतात.

आणखी वाचा : कोमाकीने भारतात सादर केली आपली नवीन ‘व्हेनिस इको’ इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…

Kia Carence हे भारतीय बाजारपेठेतील कंपनीचे दुसरे MPV आहे आणि २०१९ मध्ये भारतात दाखल झाल्यापासूनचे पाचवे उत्पादन आहे. Kia भारतात Sonet, Cars, Seltos, Carnival आणि EV6 सारख्या कार विकते.

Kia India ने या वर्षी फेब्रुवारीमध्ये Carence मॉडेल लाँच केले, जे ६-सीटर आणि ७-सीटर सीटिंग पर्यायांसह येते. या कारमध्ये १.५-पेट्रोल, १.४-लिटर पेट्रोल आणि १.५-डिझेल पॉवरट्रेन तीन ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत. मार्चच्या सुरुवातीला, किआ कार्सने या वर्षी १४ जानेवारीपासून सुरू झालेल्या बुकिंगच्या दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ५०,००० बुकिंगचा टप्पा ओलांडला होता.

Kia Carens MPV मध्ये १०.२५-इंच एचडी टचस्क्रीन नेव्हिगेशन, बोस साउंड सिस्टम, एअर प्युरिफायर, हवेशीर फ्रंट सीट्स, दुसऱ्या रांगेतील सीट वन टच इझी इलेक्ट्रिक टंबल आणि सनरूफ यांसारख्या वैशिष्ट्यांसह येते. Kia Carence ६ एअर बॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग आणि इतर सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कोमाकीने भारतात सादर केली आपली नवीन ‘व्हेनिस इको’ इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…

संबंधित बातम्या

२० सेकंदात बाईकचा स्पीड १६ kmph वरुन ११४ kmph वर गेला अन् दोघांचा मृत्यू झाला; धक्कादायक घटनाक्रम हेल्मेट कॅमेरात कैद
१० सेकंदात हायस्पीड, १६० किमी मायलेज.. टाटा ‘नॅनो’ इलेक्ट्रिक कार बाजारात येणार? किंमत किती?
बाजारपेठेत दाखल झाली TVS ची नवीन Jupiter Classic स्कूटर; बघा खास फीचर्स
Petrol-Diesel Price on 1 December 2022: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठी उलाढाल; पाहा नवे दर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Gujarat Election Results 2022 Live : भाजपा, काँग्रेस की आप? गुजरात विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? वाचा प्रत्येक अपडेट…
HP Election Results 2022 Live : हिमाचल प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात, भाजपा गड राखणार की काँग्रेस मारणार बाजी?
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस