Car launch in december 2022 : हा वर्ष कार चाहत्यांसाठी उत्साहवर्धक राहिला. कारण अनेक कार कंपन्यांनी आपल्या प्रमियम आणि बजेट कार्स आधुनिक तंत्रज्ञानासह सादर केल्या. इनोव्हामध्ये पहिल्यांदाच सनरूफ मिळत आहे, तर आलिशान कार निर्मिती कंपनी रोल्स रॉयसने आपली पहिली इलेक्ट्रिक कार स्पेक्टर लाँच करून अनेकांना आश्चर्यचकित केले. भविष्य इलेक्ट्रिक वाहनांचे असल्याचे यातून कळते. जीप ग्रँड चेरोकी, नवीन ऑडी AUDI Q8 E TRON, volvo ex 90 सह अनेक कार्सनी बाजारात एन्ट्री केली. एकंदरीत हा वर्ष कार कंपन्यांसाठी चांगला ठरला. मात्र, डिसेंबरमध्येही काही जबरदस्त वाहने बाजारपेठेत लाँच होणार आहेत. कोणती आहेत ही वाहणे? टाकूया एक नजर.

१) बीएमडब्ल्यू एक्स ७

Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

BMW X7 १० डिसेंबरला एक्स ७ एसयूव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. BMW X7 facelift कारला सुधारित फ्रंट फॅसिया मिळाला आहे, जो वाहनाचे नवीन स्प्लिट हेडलॅम्प डिजाईन दर्शवतो. त्याचबरोबर, कारमध्ये १४.९ इंच टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि १२.३ इंच ऑल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. कार xDrive 40i आणि xDrive 30d या ट्रिम पर्यायांमध्ये भारतात उपलब्ध होणार आहे.

(डिसेंबरमध्ये कार घेण्याचा विचार करत आहात? जाणून घ्या नफे, तोटे)

२) मर्सिडिज बेन्झ ईक्यूबी

मर्सिडिजने आधीच भारतात ईक्यूसी आणि ईक्यूएस मॉडेल्स लाँच केले आहेत. आता Mercedes-Benz EQB ही लाइनअपमधील सर्वात नवीन एडिशन असणार आहे. या कारला स्लिक एलईडी हेडलॅम्पसह ब्लँक्डऑफ फ्रंट ग्रिल आणि मागच्या भागात फूल विड्थ एलईडी टेल लाईट मिळाले आहे.

३) मर्सिडिज बेन्झ जीएलबी

कंपनी भारतात Mercedes-Benz GLB एसयूव्ही लाँच करण्यासाठी सज्ज आहे. ही कार भारतात २ डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. ही सात सीटर कार असून तिला भव्य डिजाईन मिळाले आहे, ज्यामुळे ती रस्त्यावर आकर्षक दिसेल याची खात्री होते. कारमध्ये व्हॉइस कमांडसह १०.२५ इंच टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, पॅनोरॉमिक सनरूफ आणि स्लाइडिंग ड्युअल रो सिट्स देण्यात आले आहेत.