scorecardresearch

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या ताफ्यात १२ नव्या गाड्या, एका कारची होतेय खास चर्चा, नंबरमध्ये दडलंय ‘हे’ गुपित

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या ताफ्यात जुन्या वाहनांच्या जागी आता १२ नवीन चकाकणाऱ्या गाड्या सामील झाल्या आहेत. एका कारची खास चर्चा रंगली आहे.

CM Bhupesh Baghel Car
भूपेश बघेल यांच्या ताफ्यात १२ नवीन गाड्या सामील. (Photo-ANI)

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शुक्रवारी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या ताफ्यासाठी नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली. या वाहनांवर लिहिलेल्या नंबर प्लेट आणि वाहनांची खासियत हा राजकीय वर्तुळात आता चर्चेचा विषय ठरला आहे. आता हे प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत की, निवडणुकीच्या वर्षात काळ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर कार मुख्यमंत्री भूपेश यांच्यासाठी लकी ठरेल की नाही? कारण त्याच्या नंबर प्लेट खूप खास आहेत.

भूपेश बघेल यांच्या ताफ्यात १२ नवीन गाड्या सामील

जुन्या वाहनांच्या जागी आता मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या ताफ्यात १२ नवीन चकाकणाऱ्या गाड्या सामील झाल्या आहेत. ही वाहने अनेक वर्षे जुनी होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते बदलण्याची मागणी करण्यात आली. ज्याचा मंजुरीनंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात नवीन गाड्यांचा समावेश करण्यात आला. आता मुख्यमंत्र्यांसाठी फॉर्च्युनर गाड्या असतील. या सर्व गाड्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असतील आणि त्या बुलेटप्रूफ असतील. बराच काळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सहभागी असलेली तवेरा बरीच जुनी आहे.

(हे ही वाचा : दमदार फीचर्स अन् डिझाईनसह Hyundai Creta देशात सादर, मिळेल तगडं मायलेज, किंमत… )

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले प्रेम व्यक्त

एकीकडे नवीन फॉर्च्युनर तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या लग्नाचा वाढदिवस. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि नवीन वाहनात बसण्यासाठी मुख्यमंत्री बघेल यांनी लग्नाचा वाढदिवस निवडला, त्यामुळे हा दिवस आणखी खास बनला. मुख्यमंत्र्यांची जन्मतारीख २३ आहे आणि विधानसभा निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहेत. यामध्ये काँग्रेस आपल्या निवडणुकीच्या निकषांवर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री बघेल त्यांच्या लकी नंबर २३ बद्दल भावूक आहेत.

नवीन वाहनांची खासियत काय आहे?

मस्क्युलर लूक असलेल्या वाहनांची किंमत २० लाखांहून अधिक आहे. यातील काही वाहने बुलेट प्रूफ आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी खास पंजाबमध्ये तयार करण्यात आले आहे. यामध्ये नेव्हिगेशन सिस्टीम, अलर्ट सिस्टीम आणि कम्युनिकेशनसाठी अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत.

(हे ही वाचा : प्रतीक्षा संपली! देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलीव्हरी सुरु, एका चार्जमध्ये धावेल 315 KM )

मुख्यमंत्री बघेल यांच्यासाठी 23 क्रमांक खास का?

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नवीन वाहनांच्या ताफ्याबाबत काँग्रेस नेते अजय साहू यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्री भूपेश बघेल पीसीसीचे प्रमुख असतानाही त्यांच्या स्कॉर्पिओचा क्रमांक ००२३ होता, त्यांच्या काळ्या फॉर्च्युनरचा क्रमांकही २३ होता. त्याचा वाढदिवस देखील २३ आहे आणि त्याचा लकी नंबर देखील २३ आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा विजयी होईल आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे आम्ही गृहीत धरत आहोत, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 14:53 IST