Citroen ही एक फ्रेंच कंपनी आहे. ही एक कार उत्पादक कंपनी आहे. Citroen कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ऑल न्यू Citroen eC3 EV ने नुकतेच भारतात पदार्पण केले आहे. त्यानंतर हे मॉडेल आता हैद्राबाद ई-मोटर शो मध्ये सादर करण्यात आले होते.

Citroen India ने हैद्राबाद येथे झालेल्या ई-मोटर शो मध्ये eC3 चे सादरीकरण केले. ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान हा शो हैद्राबाद येथे पार पडला. Citroen eC3 चे बुकिंग सुरु असून तुम्ही २५,००० रुपये भरून तुम्ही ही कार बुक करू शकणार आहात.

Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video
28 kg of on single use plastic seized by nmmc in navi mumbai
नवी मुंबईत २८ किलो एकल वापर प्लास्टिक जप्त, ९० हजार रुपयांचा दंड वसूल
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

हेही वाचा : GT Battista: महिंद्राने लाँच केली जगातील सर्वात वेगवान कार; अवघ्या दोन सेकंदात मिळतो ‘इतका’ स्पीड

Citroen eC3 EV मध्ये २९.२ kWh LFP बॅटरी पॅक मिळते. ही कार एकदा चार्ज केली की, ३२० किमी धावते असा दावा करण्यात आला आहे. तसेच ही कार गल फ्रंट एक्सल-माउंट इलेक्ट्रिक मोटरसह येते जी ५६ बीएचपी पॉवर आणि १४३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. याह टॉप स्पीड हा १०७ किमी प्रतितास इतका आहे. इको आणि स्टॅंडर्ड या दोन ड्रायव्हिंग मोडसह री-जनरेशन ब्रेकिंग सिस्टीमसह येते.

Citroen India या महिन्यात त्यांच्या eC3 च्या किंमती जाहीर करू शकते. Citroen eC3 एक इलेक्ट्रिक क्रॉसओवर आहे जी हॅचबॅकच्या ICE सिरीजवर आधारित आहे. ज्याची सध्याची एक्स शोरूम किंमत ५.९८ लाख ते ८.२५ लाख रुपये आहे. Citroen eC3 ही कार भारतीय बाजारपेठेत टाटा Tiago EV आणि Tigor EV शी स्पर्धा करणार आहे.