Citroens first electric car to be launched in India | Loksatta

Citroen ची पहिली इलेक्ट्रिक कार भारतात करणार धमाकेदार एंट्री; जाणून कशी असेल ही कार…

फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनी Citroen आज २९ सप्टेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत धमाकेदार एंट्री करणार आहे.

Citroen ची पहिली इलेक्ट्रिक कार भारतात करणार धमाकेदार एंट्री; जाणून कशी असेल ही कार…
Photo-financialexpress

फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनी Citroen आज २९ सप्टेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत धमाकेदार एंट्री करणार आहे. कंपनी भारतात आपली पहिली आणि नवीन इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. या कारचे ‘Citroen C3’ नाव असून कंपनीने या कारचा एक टीझरही नुकताच जारी केला होता. आता कंपनीने भारतासाठी आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारची पुष्टी केली आहे. कंपनी आपल्या नवीन आणि पहिल्या इलेक्ट्रिक कारचे अनावरण करणार आहे. याआधी असे सांगितले जात होते की ही कार २०२३ मध्ये सादर केली जाईल.

अशी असेल ही कार

चाचणी दरम्यान ही कार बर्‍याच वेळा पाहिली गेली आहे, जी जुलैमध्ये सादर झालेल्या ICE आवृत्तीसारखीच आहे. या नवीन इलेक्ट्रिकची भारतातील टाटा टियागो ईव्हीशी टक्कर होईल, जी भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. कारशी संबंधित कोणतीही विशेष माहिती अद्याप समोर आलेली नाही.

आणखी वाचा : तारीख ठरली! ‘या’ दिवशी भारतात सादर होणार ‘Nissan Leaf Electric Car’! जाणून घ्या फीचर्स…

अलीकडेच, Citroen ने जागतिक बाजारपेठेत चार इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या, ज्यात दोन आसनी Ami, C4 इलेक्ट्रिक SUV आणि दोन MPV चा समावेश आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे की नवीन C3 इलेक्ट्रिक कार ५०kWh बॅटरीसह येईल, जी एका चार्जवर ३५० किलोमीटरपर्यंत धावू शकेल. या अनेक इलेक्ट्रिक्सची इतर वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. कंपनी लवकरच कारशी संबंधित माहिती उघड करेल अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2022 at 10:04 IST
Next Story
Petrol-Diesel Price on 29 September 2022: इंधनांच्या दरातील घसरण सुरूच! आज किती रुपयांनी कमी झाली किंमत?