CNG Car Care: देशात दर महिन्याला सीएनजी कार मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त इंधन आहे, ज्यामुळे बहुतांश लोक लांबच्या प्रवासासाठी सीएनजी कारचा पर्याय निवडतात, अशाने पैशांची बचत करता येते. पण, सुरक्षेच्या दृष्टीने सीएनजी कार वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे, नाहीतर भविष्यात मोठ्या जीवघेण्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आम्ही तुम्हाला सीएनजी कार वापरताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, यासंदर्भात माहिती देत आहोत.

सीएनजी कार वापरताना टाळा ‘या’ ५ चुका (CNG Car Maintenance Tips)

१) सीएनजी कारमध्ये धुम्रपान करणे टाळा

बऱ्याचदा लोक त्यांच्या कारमध्ये धुम्रपान करतात, जे केवळ आरोग्यासाठी हानिकारक नाही तर सीएनजी कारमध्ये तर ते अधिक घातक ठरू शकते. कारमध्ये थोडीशी जरी सीएनजी गळती होत असल्यास आग लागण्याचा धोका वाढतो.

Best selling Activa in 2024 honda activa sale hikes by 22 percent tvs suzuki ola is in the toplist
‘या’ स्कूटरने केलं मार्केट जाम! खरेदीसाठी शोरूमच्या बाहेर झाली ग्राहकांची गर्दी, ठरली वर्षातील सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Upcoming Tata Cars in India 2024 & 2025
Upcoming Tata Cars : पैसे तयार ठेवा, नवीन वर्षात टाटाच्या ‘या’ ३ जबरदस्त कार होणार लाँच; जाणून घ्या दमदार फिचर्स
Devendra Fadnavis vs Sanjay Raut
“…अन्यथा आम्ही आमचं पुस्तक उघडू”, राऊतांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांऐवजी…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Top 3 Cheapest Electric Cars Under 5 Lakhs in India
या आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; फूल चार्जमध्ये मिळेल २३० किमीपर्यंत रेंज; किंमत ऐकून विश्वास बसणार नाही

२) सीएनजी भरताना इंजिन करा बंद

वाहनात सीएनजी भरताना नेहमी इंजिन बंद ठेवा आणि वाहनातून बाहेर पडा. असे न केल्यास सीएनजी नीट भरता येत नाही. तसेच सीएनजी भरताना गाडीला आग लागण्याची शक्यता असते. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. या घटनेत गाडीत बसलेले लोकही अनेकदा त्यात अडकल्याचे दिसून आले, त्यामुळे सीएनजी भरताना वाहनापासून काही अंतर दूर उभे राहा.

३) गळती झाल्यास काय करावे

सीएनजी कार चालवताना सीएनजी गळती होत आहे असे वाटत असल्यास ताबडतोब कार सुरक्षित ठिकाणी घेऊन जा आणि इंजिन बंद करा. गळतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण ते वाहनात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप धोकादायक ठरू शकते.

Cheapest CNG Cars : ३४ किमी मायलेज, किंमत ५.९६ लाख रुपये; ‘या’ आहेत देशातील सर्वांत स्वस्त सीएनजी कार्स, वाचा फीचर्स

४) ओरिजनल सीएनजी किट बसवा

कधीही कारमध्ये स्वस्त किंवा बनावट सीएनजी किट बसवू नका. कारण स्वस्त किंवा बनावट सीएनजी किट सुरक्षिततेच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. कार चालवताना कधी काय समस्या उद्भवू शकतात हे सांगता येत नाही, त्यामुळे अधिकृत जागेवरूनच ओरिजनल किट विकत घ्या आणि आपल्या कारमध्ये बसवा.

५) कारमध्ये लोकल ॲक्सेसरीज लावू नका

अनेकांना कारमध्ये विविध लोकल ॲक्सेसरीज लावून सजवण्याची आवड असते. पण, सीएनजी कारमध्ये कधीच लोकल ॲक्सेसरीज लावू नका, कारण वायरिंगमध्ये चुकून काही गडबड निर्माण झाली तर भविष्यात ती गडबड धोकादायक ठरू शकते.