ओला इलेक्ट्रिकबाबत ग्राहकांकडून काही समाधानकारक प्रतिक्रिया मिळत नाहीत. ओला इलेक्ट्रिकला लागलेल्या आगीनंतर अनेक वाद चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान, ओला ई-स्कूटरबाबत दोन विचित्र प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये कंपनीवर संतापलेल्या एका ग्राहकाने ओलाची ई-स्कूटर गाढवाला बांधून शहरभर पळवली, तर दुसऱ्या घटनेत एका व्यक्तीने पेट्रोल शिंपडून या ई-स्कूटरला आग लावली.

ओलाच्या ई-स्कूटरवर असमाधानी असलेल्या महाराष्ट्रातील एका व्यक्तीने अनोखा निषेध करत ई-स्कूटर गाढवाला बांधून शहरभर पळवली. यासोबतच बीड जिल्ह्यातील सचिन गित्ते यांनी पोस्टर आणि बॅनरद्वारे लोकांना कंपनीवर विश्वास ठेवू नका, असे सांगितले. त्यांनी म्हटलंय, “ओला या फसव्या कंपनीपासून सावध रहा” आणि “ओला कंपनीकडून दुचाकी खरेदी करू नका”. सचिन यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये ओलाची ई-स्कूटर बुक केली होती, त्यानंतर २४ मार्च २०२२ रोजी ई-स्कूटरची डिलिव्हरी करण्यात आली होती.

ट्विटरची सुरुवात झाली तेव्हा पहिलं ट्विट काय होतं माहित आहे? वाचा…

एका वृत्तानुसार, सचिन सांगतात की दुचाकी विकत घेतल्यानंतर केवळ सहा दिवसांत स्कुटरने काम करणे बंद केले. कंपनीशी संपर्क साधल्यानंतर ओला मेकॅनिकने त्याची स्कूटर तपासली. मात्र ते दुरुस्त करण्यासाठी कोणीही न आल्याने त्यांनी ई-स्कूटर गाढवाला बांधून शहरभर पळवली. यापूर्वी त्यांनी कस्टमर केअरला अनेक कॉल्सही केले होते, मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत ग्राहक मंचात तक्रार करण्यात आली आहे.

नुकत्याच घडलेल्या एका घटनेत ओला एस१ प्रो च्या मालकाने कथितरित्या त्याची स्कूटर पेटवली. त्यानंतर त्याचा व्हिडीओ इंटरनेट मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका अहवालानुसार, ओला एस१ प्रो चे मालक डॉ. पृथ्वीराज यांनी स्कूटर जाळली कारण ते स्कूटरच्या कामगिरी आणि रेंजवर नाराज होते. अहवालात पुढे म्हटले आहे की घटनेच्या तीन महिन्यांपूर्वी त्यांना इलेक्ट्रिक स्कूटर मिळाली होती आणि या स्कूटरमध्ये काही समस्या येत होत्या.

दोन पायलट्सनी हवेतच केली विमानांची अदलाबदल अन्; घटनेचा Video Viral

शिवाय, त्या व्यक्तीने यापूर्वी याच समस्येबाबत ओला इलेक्ट्रिककडे तक्रार केली होती. ओला सपोर्टने स्कूटरची तपासणी केली आणि ती चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले. मात्र ४४ किलोमीटरनंतर ई-स्कूटर बिघडल्याने त्या व्यक्तीने संतापून आपली स्कूटी पेट्रोल ओतून पेटवून दिली. तामिळनाडूतील अंबूर बायपास रोडजवळ ही घटना घडली. अलीकडेच कंपनीने ई-स्कूटर्सचे १,४४१ युनिट्स परत मागवले आहेत.

इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी कंपन्यांना सदोष वाहने परत आणण्यासाठी त्वरित पावले उचलण्यास सांगितले. ते म्हणाले की, मार्च, एप्रिल आणि मेमध्ये तापमानाचा पारा वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये काही समस्या निर्माण होत आहेत. गडकरी म्हणाले की, देशातील ईव्ही उद्योगाने नुकतेच काम सुरू केले आहे आणि सरकार त्यांच्यासाठी कोणताही अडथळा निर्माण करू इच्छित नाही. मात्र सरकारसाठी सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.