scorecardresearch

Premium

Car Sales in May 2023: सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप १० एसयूव्हीमध्ये Creta ची बाजी, यादीत ‘या’ कंपनीच्या तीन गाड्यांचा आहे समावेश

मे महिन्यात कार कंपन्यांनी विक्रीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

top 10 best suv selling in may 2023
ह्युंदाई Creta च्या युनिट्सची झाली सर्वाधिक विक्री (Financial Express )

देशामध्ये सध्या अनेक वाहन उत्पादक कंपन्या आहेत. त्यामध्ये मारूती सुझुकी, ह्युंदाई , टाटा मोटर्स, किया एमजी मोटर्स आणि अन्य अशा कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वच कंपन्यांनी मे महिन्यातील आपल्या युनिट्सच्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. मोठी मागणी आणि सेमीकंडक्टर पुरवठ्यामध्ये सुधारणा झाल्यामुळे सर्व कंपन्यांनी मिळून पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये मे २०२३ या महिन्यामध्ये एकूण ३,३४,८०० युनिट्सची विक्री केली आहे. ज्यामध्ये SUV सेगमेंटचा वाटा ४७ टक्के इतका होता.

मे महिन्यामध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV मध्ये ह्युंदाई मोटर्स इंडियाच्या Creta चा समावेश आहे. तर पहिल्या टॉप १० बेस्ट सेलिंग एसयूव्हीमध्ये मारूती सुझुकीच्या Breeza, Fronx आणि Grand Vitara या तीन एसयूव्हींचा समावेश आहे. या बाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

हेही वाचा : Car Sales in May 2023: देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० गाड्यांमध्ये एकट्या मारुतीच्या ‘या’ सात कार्स

मे २०२३ मध्ये टॉप १० एसयूव्हीच्या विक्रीमध्ये ह्युंदाई कंपनीची क्रेटा आणि व्हेन्यू यांचा समावेश होता. तसेच टाटा मोटर्सच्या नेक्सॉन आणि पंच आणि महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो व किआ इंडियाच्या सोनेट या Suv चा समावेश होता.

ह्युंदाई क्रेटा मे २०२३ या महिन्यात सर्वाधिक विक्री झालेली एसयूव्ही आहे. कंपनीने या एसयूव्हीचे १४,४४९ युनिट्सची विक्री केली आहे. त्यानंतरच्या टाटा मोटर्सच्या नेक्सॉनच्या १४,४२३ युनिट्सची विक्री झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर मारूती सुझुकीच्या ब्रेझा असून याच्या १३,३९८ युनिट्सची विक्री झाली आहे. टाटा पंचच्या ११,१२४ युनिट्सची विक्री झाल्यामुळे ही एसयूव्ही ह्युंदाई व्हेन्यूच्या पुढे होती. ह्युंदाई व्हेन्यूच्या १०,२१३ युनिट्सची विक्री केली. तसेच नुकत्याच लॉन्च झालेल्या मारूती सुझुकी Fronx ने ९,८६३ युनिट्सची विक्री केली.

हेही वाचा : होंडाने लॉन्च केली स्मार्ट- Key फिचर असलेली ‘ही’ स्कूटर; टॉप व्हेरिएंटचे बुकिंग सुरू, किंमत आहे फक्त…

मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या १० SUV कार्स

ह्युंदाई Creta – १४,४४९ युनिट्स
टाटा Nexon – १४,४२३ युनिट्स
मारूती सुझुकी Breeza – १३,३९८ युनिट्स
टाटा Punch – ११,१२४ युनिट्स
ह्युंदाई Venue – १०,२१३ युनिट्स
मारूती सुझुकी Fronx – ९,८६३ युनिट्स
महिंद्रा Scorpio – ९,३१८ युनिट्स
मारूती सुझुकी Grand Vitara – ८,८७७ युनिट्स
किआ Sonet – ८,२५१ युनिट्स
महिंद्रा Bolero – ८,१७० युनिट्स

मे महिन्यात कार कंपन्यांनी विक्रीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. Maruti Suzuki कंपनीने वाहनांच्या विक्रीत दहा टक्के वाढ नोंदवली आहे. याशिवाय Bajaj Auto, kia, Hyundai कंपनीच्या विक्रीतही वाढ दिसून आली आहे. Financial Expressने दिलेल्या वृत्तानुसार मे महिना कार कंपन्यांसाठी खूप फायदेशीर ठरला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Creta top at best selling top 10 suv cars nexon breeza punch scorpio check full list and details tmb 01

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×