Ruturaj Gaikwad JAVA Bike: भारतीय क्रिकेटपटू आणि महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड आपल्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एका ओव्हरमध्ये ७ छक्के मारत त्याने विक्रम केला होता. आता पुन्हा एकदा ऋतुराज चर्चेत आला आहे. आता ही चर्चा ऋतुराजच्या विक्रमाची नव्हे तर ही चर्चा त्याने खरेदी केलेल्या नव्या बाईकची आहे. ऋतुराजने मूनस्टोन व्हाईट रंगाची नवीन ‘Jawa 42 Bobber’ ही बाईक खरेदी केली आहे. आता या ऋतुराजच्या बाईकची सर्वत्र चर्चा रंगत आहे.

Jawa 42 Bobber ‘अशी’ आहे खास

Jawa 42 Bobber ही कंपनीची दुसरी बाईक आहे, जी Bobber मॉडेलमध्ये आणली गेली आहे. कंपनीची पहिली बाईक जावा पेराक होती. मिळालेल्या माहितीनुसार, जावा 42 Bobber चे डिझाइन आणि फीचर्स पेराकपासून प्रेरित आहेत.

Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
sharmila tagore property
“मी खरेदी केलेली संपत्ती माझ्याच नावावर”, शर्मिला टागोर यांची माहिती; म्हणाल्या, “इस्लाममध्ये मृत्यूपत्र करण्याची…”
What Kangana Said?
“आपल्या देशात पॉर्नस्टारला जितका आदर..”, सनी लिओनीचं नाव घेत कंगनाने केलं ‘त्या’ वक्तव्याचं समर्थन

(हे ही वाचा : Ankita Lokhande Cars Collection: अंकिता लोखंडेलाही आहे महागड्या गाड्यांचा शौक; किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का )

Jawa 42 Bobber ही एक निओ-रेट्रो बाईक आहे, जी भारतातील क्लासिक बाईकच्या चाहत्यांना लक्षात ठेवून आणली गेली आहे. जावा 42 बॉबरची डिझाइन जावा पेराक बॉबर सारखीच आहे. या बाईकमध्ये राउंड एलईडी हेडलॅम्प्स, राउंड एलईडी टेललॅम्प्स आणि स्मॉल टर्न इंडिकेटर देण्यात आले आहेत. बाईकला लो स्लंग रायडर सीट आणि ड्युअल एक्झॉस्ट सायलेन्सर मिळते. जे पेराकसारखेच आहे.

इंजिनबद्दल बोलायचे झाले, तर जावा 42 बॉबरमध्ये ३३४cc सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे तेच इंजिन आहे जे कंपनी पेराकमध्ये देखील वापरले आहे. हे इंजिन ३०.६४ bhp ची पॉवर आणि ३२.६४ Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

Jawa 42 Bobber किंमत

जावाच्या या बाईकची एक्स-शोरुम किंमत २.०७ लाख रुपये आहे. कंपनीच्या पेराकला देखील ग्राहकांची जबरदस्त पसंती मिळाली होती. पेराकनंतर ४२ बॉबर ही कंपनीची देशात विक्री होणारी दुसरी सर्वात स्वस्त बाईक आहे.

ऋतुराज गायकवाडलाही Jawa 42 Bobber वेड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर आणि भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२० मध्ये त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. ऋतुराजला ही Jawa 42 Bobber या बाईकचे वेड लागले आहे. म्हणून त्याने नुकतीच आपल्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये Jawa 42 Bobber हिलाही आणले आहे.