Jawa Bobber 42 Bike Finance Plan: शक्तिशाली दुचाकी निर्माता कंपनी जावाने आपली नवीन Jawa Bobber 42 ही बाईक मागच्या वर्षीच देशात दाखल केली आहे. Bobber 42 ही सर्वोत्तम बाईक मानली जाते. यासोबतच ही बाईक देशातील तरुणाईला खूप आवडते. एवढेच नाही तर कंपनीची ही बाईक तुम्हाला उत्कृष्ट मायलेजही देते. या बाईकला अनेक फीचर्ससह शानदार लुक देण्यात आला आहे. तज्ञांच्या मते, कंपनीची ही बाईक हार्ले डेव्हिडसनलाही टक्कर देते. आज आम्ही तुम्हाला ही बाईक सोप्या फायनान्स प्लॅनसहीत स्वस्तात कसे खरेदी करता येईल, याविषयी माहिती देणार आहोत.

Jawa Bobber 42 किंमत

ही बाईक एकूण तीन रंगामध्ये बाजारात आणली गेली आहे, ज्याच्या किमतीही वेगवेगळ्या आहेत. याच्या मिस्टिक कॉपर कलरची एक्स-शोरूम किंमत २.०६ लाख रुपये, मून स्टोन व्हाइट कलरची एक्स-शोरूम किंमत २.०७ लाख रुपये आणि जॅस्पर रेडची एक्स-शोरूम किंमत २.०९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बाईकमध्ये ३३४cc इंजिन देण्यात आले आहे.

Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी
BMW iX xDrive50 launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी इलेक्ट्रिक SUV देशात दाखल, सिंगल चार्जमध्ये धावते ६३५ किमी, पण किंमत तर…

Jawa Bobber 42 फायनान्स प्लॅन

ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, बँक Jawa 42 Bobber बाईक खरेदी करण्यासाठी ६ टक्के वार्षिक व्याजदराने २,१९,६४८ रुपये कर्ज देते. त्यानंतर २१,००० रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही ही लोकप्रिय क्रूझर बाइक खरेदी करू शकता. बँकेकडून जावा 42 बॉबर बाईक खरेदी करण्यासाठी, कर्ज तीन वर्षांसाठी म्हणजेच ३६ महिन्यांसाठी दिले जाते आणि या काळात तुम्हाला दरमहा बँकेत ६,६८२ रुपये ईएमआय भरावा लागेल.

Jawa 42 Bobber चे फीचर्स

कंपनीने या बाईकमध्ये अतिशय मजबूत इंजिनही उपलब्ध करून दिले आहे. यात ३३४ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ३२.७४ Nm च्या पीक टॉर्कसह ३०.६४ Bhp कमाल पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. यासोबतच कंपनी इंजिनसोबत ५-स्पीड गिअरबॉक्स प्रदान करते. जावा 42 बॉबरला मागील बाजूस एक लहान लगेज रॅक, शानदार लूक असलेली नवी सीट, हेडलाइट आणि इन्स्ट्रुमेंटेशन देण्यात आले आहे. तसेच, यामध्ये उत्तम राइडिंगसाठी ABS कॅलिब्रेशनला इंप्रूव्ह करण्यात आले आहे. जावा 42 बॉबरला एक एलसीडी डिस्प्लेसह एलईडी लायटिंग देण्यात आली आहे, तर याचे टेल-लॅम्प पेराकपेक्षा वेगळ्या पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे.