Apple इलेक्ट्रिक कारबद्दल कारप्रेमींमध्ये उत्सुकता; स्टियरिंग नसेल आणि….

अ‍ॅप्पल कंपनीचं कोणतंही प्रोडक्ट म्हटलं की उत्सुकता शिगेला पोहोचते. अ‍ॅप्पल प्रोडक्टवर ग्राहकांचा पूर्ण विश्वास आहे.

Apple-FB
Apple इलेक्ट्रिक कारबद्दल कारप्रेमींमध्ये उत्सुकता; स्टियरिंग नसेल आणि….(Photo- Indian Express)

अ‍ॅप्पल कंपनीचं कोणतंही प्रोडक्ट म्हटलं की उत्सुकता शिगेला पोहोचते. अ‍ॅप्पल प्रोडक्टवर ग्राहकांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे नव्या प्रोडक्टची चर्चा होते. तेव्हा तेव्हा ग्राहकांमध्ये उत्सुकता असते. आता अ‍ॅप्पल पहिली स्वंयचली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. वर्ष २०२५ पर्यंत अ‍ॅप्पलची नवी इलेक्ट्रिक कार बाजारात येईल असं सांगण्यात येत आहे. ही सेल्फ ड्रायव्हिंग कार असेल आणि यात पॅडल आणि स्टियरिंग नसेल, अशी चर्चा आहे.

अ‍ॅप्पल गेल्या अनेक दिवसांपासून प्रोजेक्ट टायटन अंतर्गत भविष्य काळातील कार कशी असेल?, यावर काम करत आहे. ऑटोनॉमस फिचर आणि इलेक्ट्रॉनिक व्हेहिकलमध्ये गेल्या काही दिवसात प्रचंड वेग आला आहे. अशात अ‍ॅप्पल ड्रायव्हरलेस कार आणण्याच्या तयारीत आहे. ड्रायव्हरलेस कार पूर्णपणे सेन्सरवर आधारित असेल. त्यात बसलेले लोकं त्यांच्या स्मार्ट डिव्हाइसवरून कार नियंत्रित करू शकतील. तसेच गाडी कंट्रोल करण्यासाठी लेफ्ट-राइट करण्याची गरज भासणार नाही. टेस्ला आणि रिव्हियन सारख्या कंपन्या अशी कार आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि चाचण्याही सुरू आहेत.

Tips: आयफोन १३ किंवा आयफोन १३ प्रो खरेदी केल्यानंतर प्रथम ‘या’ गोष्टी करा

अ‍ॅपलची पहिली इलेक्ट्रिक कार आणण्यासाठी जगभरातील ऑटोमोबाईल तज्ज्ञ नियोजन आणि अंमलबजावणीवर काम करत आहेत. गाडी बाजारात आणण्यापूर्वी कंपनी जगभरातील लोकप्रिय बाजारपेठेत ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापित करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. अ‍ॅपलच्या आगामी कारची अधिक माहिती येत्या काळात समोर येईल. दुसरीकडे Xiaomi, OnePlus आणि Reality सारख्या टेक कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत प्रवेश करणार आहेत आणि इलेक्ट्रिक स्कूटर, बाईक आणि कार लॉन्च करू शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Curiosity among car lovers about apple electric car rmt

Next Story
फेलिक्स बॉमगार्टनर
ताज्या बातम्या