December Car sale: डिसेंबर महिना नवीन कार खरेदीसाठी सर्वोत्तम महिना मानला जातो. गाड्यांचा स्टॉक क्लीअर करण्यासाठी कंपन्या अधिक सवलत देतात. एवढंच नाही, तर कार डीलर्स ग्राहकांना अतिरिक्त लाभही देतात. या वर्षीही डिसेंबरमध्ये कार कंपन्या त्यांचे स्टॉक क्लीअर करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मारुती सुझुकीपासून महिंद्रापर्यंत सर्व जण सवलत देण्यात आघाडीवर आहेत. जर तुम्ही या महिन्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या कोणत्या कारवर किती सवलत मिळणार आहे.

मारुती सुझुकी

या महिन्यात मारुती सुझुकी आपल्या कारवर खूप चांगली सवलत देत आहे. Alto K10 वर या महिन्यात ७२,१०० रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे. त्याशिवाय S-Presso वर ७६,९५३ रुपयांपर्यंत आणि WagonR वर ७७,००० रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. कंपनी आपल्या लहान कार Celerio वर ८३,१० रुपये, जुन्या Swift वर Rs ३५,००० व नवीन Swift वर ७५,००० पर्यंत मोठी सवलत देत आहे.

Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर
Honda new year discount honda car offers upto 90,000 discount in January
HONDA ची बम्पर ऑफर! नववर्षात ‘या’ ३ गाड्यांवर ९०,००० पर्यंत डिस्काउंट, होईल पैशांची बचत
Here are the top five trending automotive topics on Google during December 2025
डिसेंबर २०२४ मध्ये Googleवर चर्चेत होत्या ‘या’ कार अन् बाईक्स, टॉप ५ ट्रेंडिंग ऑटोमोटिव्ह विषयांची यादी पाहा
Honda Elevate Black Edition
नाद करायचा नाय! ह्युंदाई क्रेटाची उडणार झोप; होंडा लाँच करणार नवीन एसयूव्ही, पाहा किंमत अन् जबरदस्त फिचर्स
Who celebrates New Year first, and who rings it in last?
First New Year: सर्वात आधी कोणत्या देशात नवीन वर्ष साजरे होते? ‘या’ देशात शेवटी साजरा होतो New Year, जाणून घ्या
Fulfilling your resolutions will bring happiness in the new year
…तर नवीन वर्ष होईल आनंददायी

हेही वाचा… आता फक्त ‘स्कोडा’चीच हवा! ६ एअरबॅग्स असणाऱ्या सगळ्यात स्वस्त SUVची बुकिंग झाली सुरू, ‘या’ तारखेपाहून होणार डिलिव्हरी

या महिन्यात Brezza च्या खरेदीवर ५०,००० रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते आणि प्रीमियम कार Frontex वर ८८,१०० रुपयांपर्यंत, Jimny वर २.५० लाख रुपये, XL6 वर ३०,००० रुपये व Grand Vitara वर १.८० लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. सर्व कारवरील सवलत रोख, एक्स्चेंज, कॉर्पोरेट, ॲक्सेसरीज आणि विशेष सवलतींच्या अंतर्गत उपलब्ध असतील.

होंडा

डिसेंबर महिन्यात होंडा आपल्या कारवर चांगली सवलत देत आहे. कंपनी तिच्या सर्वांत लोकप्रिय SUV Elevate वर ९५,००० पर्यंत सवलत देत आहे. त्याशिवाय कॉम्पॅक्ट सेडान कार अमेझवर १.२६ लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. तसंच, जर तुम्ही या महिन्यात कंपनीची सेडान कार सिटी खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर तुम्हाला या कारवर १.०७ लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे.

ह्युंदाई

ह्युंदाईनेही त्यांच्या कारवर वर्षाच्या शेवटी सवलत देऊ केली आहे. या महिन्यात Grand i10 वर ५८,००० रुपयांपर्यंत, Exeter वर ४८,०००, Aura वर ३३,००० व i20 वर ५५,००० रुपयांपर्यंत सवलत उपलब्ध आहे. त्याशिवाय कॉम्पॅक्ट SUV व्हेन्यूवर ७६,००० रुपयांपर्यंत आणि Alcazar वर ८५,००० रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. तसेच कंपनी Ionic EV वर दोन लाख रुपयांपर्यंत सवलत देत आहे.

हेही वाचा… ‘या’ स्कूटरने केलं मार्केट जाम! खरेदीसाठी शोरूमच्या बाहेर झाली ग्राहकांची गर्दी, ठरली वर्षातील सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर

टाटा मोटर्स

या महिन्यात टाटा मोटर्सने त्यांच्या कारवर वर्षअखेरीस सवलत दिली आहे. तुम्ही छोटी कार Tiago खरेदी करणार असाल, तर त्यावर २५,००० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. त्याशिवाय Tigor वर ४५,००० रुपये, Punch वर १५,००० रुपये, Altroz ​​वर ६५,००० रुपये व Nexon वर ३०,००० रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. एवढेच नाही, तर नवीन सफारी आणि हॅरियरवर २५,००० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे.

महिंद्रा

महिंद्राने या महिन्यात आपल्या वाहनांवर खूप चांगली सवलत दिली आहे. या महिन्यात तुम्ही Bolero वर १.२० लाख रुपये, scorpio वर ५०,००० रुपये व XUV700 वर ४०,००० रुपये वाचवू शकता. या सवलतीचा लाभ एक्स्चेंज, कॅश, कॉर्पोरेट, ॲक्सेसरीज व विशेष सवलतीच्या रूपाने मिळेल.

Story img Loader