भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विश्वचषक विजेता कर्णधार एमएस धोनी मैदानावरील कामगिरीसाठी ओळखला जातो. धोनी आपल्या खेळावर आणि क्रिकेटवर जेवढं प्रेम करतो तितकच तो आणखीन एका गोष्टीवर प्रेम करतो आणि ती गोष्ट म्हणजे बाईक्स आणि कार. धोनीला बाईक्स आणि कारचे प्रचंड वेड आहे. धोनी त्याच्या उत्कृष्ट कार आणि बाइक कलेक्शनसाठीही प्रसिद्ध आहे. बिग बॉय टॉईजने गेल्या महिन्यात आयोजित केलेल्या लिलावात महेंद्रसिंह धोनीन भाग घेतला होता. या लिलावातून एक विंटेज लँड रोव्हर-३ एसयूव्ही गाडी त्याने खरेदी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुग्राममधील बिग बॉय टॉईज शोरूममध्ये ऑनलाइन लिलावात अनेक विंटेज मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध होते. महेंद्रसिंग धोनीला या लिलावातील लँड रोव्हर ३ गाडी आवडली आणि अखेरीस त्याने त्याची बोली जिंकली. बीटलचा लिलाव १ रुपयांपासून सुरू झाला आणि २५ लाखांपर्यंत गेला. लिलावात नवीन ग्राहकांचा सहभाग दिसला ज्यांना व्हिंटेज कार कुठून विकत घ्यायच्या हे माहित नव्हते आणि त्यापैकी बरेच जण पहिल्यांदाच विंटेज कार खरेदी करणारे होते. या लिलावात काही सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. एमएस धोनीने लिलावात भाग घेतला आणि लँड रोव्हर ३ खरेदी केली. १९७० च्या दशकात बनवलेल्या आणि १९८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत उत्पादन केलेल्या कारमध्ये सुरुवातीला२.२५ लिटर इंजिन होते. हे चार स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन बॉक्ससह देण्यात आले होते. तथापि, धोनीच्या गॅरेजमध्ये सामील होणार्‍या या मॉडेलच्या नेमक्या वैशिष्ट्यांची माहिती समोर आलेली नाही.

Rolls Royce लॉन्च करणार जगातील सर्वात महागडी कार; किंमत ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

धोनीकडे त्याच्या वैयक्तिक संग्रहात काही कार आणि बाइक आहेत. त्याच्या गॅरेजमध्ये मर्सिडीज-बेंझ जीएलई, ऑडी क्यू ७ आणि जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉकसारख्या काही अप्रतिम चारचाकी गाड्या आहेत. कॉन्फेडरेट हेलकॅट, यामाहा आरडी ३५०, हार्ले डिवडसन फॅटबॉय, बीएसए गोल्डस्टार, कावासाकी निंजा झेडएक्स14आर आणि कावासाकी निंजा एच२ यासारख्या बाइक्स आहेत.

Car Tips: पहिल्यांदा गाडी खरेदी करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा नुकसान होऊ शकतं

धोनी हा भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने ३३२ सामन्यांचे नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीने आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा चार विजेतेपदे मिळवून दिली आहेत. याशिवाय त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२०चे विजेतेपदही जिंकले आहे.महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी यांचं शिक्षण एकाच शाळेत झालं. पण तेव्हा हे दोघं एकमेकांना ओळखायचे सुद्धा नाहीत. साक्षी आणि धोनीची पहिली भेट २००८ मध्ये कोलकाताच्या ताज हॉटेलमध्ये झाली. तेव्हा हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणानंतर साक्षीची तिथे ट्रेनिंग सुरु होती. औरंगाबादमधून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतल्यानंतर साक्षी कोलकात्त्यातील हॉटेलमध्ये इंटर्नशिप करत होती. तिथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली आणि दोन वर्षांनंतर ४ जुलै २०१० रोजी दोघांनी लग्न केलं.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhoni buys land rover series 3 vintage car in bbt online auction rmt
First published on: 19-01-2022 at 11:48 IST