वाढत्या प्रदूषणामागे डिझेल वाहनांमधून बाहेर पडणारा हानिकारक वायू एक मुख्य कारण आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात सर्वाधिक प्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत डिझेल वाहनांची संख्या देखील इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे डिझेल वाहनांमुळे वायू प्रदूषणाची पातळी वाढली असल्याचे म्हटले जाते. यावर आधारित करण्यात आलेल्या एका अभ्यासात एक नवी माहिती समोर आली आहे.

दिल्ली शहरात नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून डिझेल गाडयांबाबत नवी माहिती समोर आली आहे. बहुतांश डिझेल गाड्यांची क्षमता अल्पावधीमध्ये खालावत असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ या गाड्यांमधून प्रदूषणाबाबत दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्सर्जन होत आहे.

आणखी वाचा – Mercedes Benz ची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात झाली लाँच; जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फीचर्स

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार हा रिसर्च स्प्रिंगरच्या एन्वायरमेंट सायन्स पॉल्युशन रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. डिझेल गाडयांमधून निघणाऱ्या धुराचा पर्यावरणावर काय परिणाम होतो हे शोधणे, हा या रिसर्चचा उद्देश होता. हा रिसर्च दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या एन्व्हायरमेंट इंजीनियरिंग डिपार्टमेंटचे असिस्टंट प्रोफेसर राजीव मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

७.५ वर्षांच्या कालावधीत डिझेल गाडयांची क्षमता खालावत आहे

या रिसर्चमध्ये दिल्लीमध्ये रजिस्टर करण्यात आलेल्या ४६० पेक्षा अधिक गाड्यांचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये असे आठळून आले की BS-III उत्सर्जन मानदंड असलेल्या बहुतेक डिझेल कारची क्षमता ९ वर्षांनी किंवा १,२५,००० किमी चालल्यानंतर खालावते. तर BS-IV उत्सर्जन मानदंड असलेल्या डिझेल कारची क्षमता ७.५ वर्षांनी किंवा ९५,००० किमी चालल्यानंतर खालावते. या दोन्ही प्रकारच्या गाडयांना पोल्युशन अंडर कंट्रोल या प्रमाणपत्राचे रिन्युअल देण्यात येऊ नये असे या रिसर्चमध्ये नमूद करण्यात आले आहे.

डिझेल गाड्यांची क्षमता अल्पावधीतच का खालावत आहे?
प्रोफेसर मिश्रा यांनी सांगितले की BS-III उत्सर्जन मानकांसह डिझेल कारची क्षमता सुमारे 9 वर्षे आहे, जे दिल्लीतील डिझेल कारसाठी १० वर्षांच्या जवळपास आहे. चिंतेची बाब म्हणजे, BS-IV वाहनांची क्षमता खालावण्याची शक्यता ७.५ वर्षे आहे. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की BS-VI उत्सर्जन मानदंड असलेल्या वाहनांचूक क्षमता अल्पावधीतच खालावत आहे.

स्क्रॅपिंग कालावधी बदलण्याची गरज

दिल्लीतील एकूण डिझेल कारपैकी सुमारे ५ ते ८% कार BS-III प्रकारच्या आहेत. BS-VI वाहने १ एप्रिल २०२० नंतर सादर करण्यात आली. यावरून हे स्पष्ट होते की, स्क्रॅपिंग धोरणात केवळ कारच्या क्षमतेअनुसार नाही तर कारचे मायलेज आणि प्रदूषणाची पातळी लक्षात घेऊन सुधारणा केली पाहिजे.

आणखी वाचा – Top Mileage bikes : दमदार मायलेजसह १०० किमीपेक्षा जास्त चालणाऱ्या स्वस्त बाईक्स कोणत्या? जाणून घ्या

अशी वाढू शकते डिझेल गाड्यांची क्षमता

यातील चांगली गोष्ट म्हणजे सुस्थितीत असलेल्या गाड्या जुन्या असूनही जास्त मायलेज देतात. या गाड्या BS-IV आणि BS-III या दोन्ही नियमांची पूर्तता करणाऱ्या आहेत असे संशोधकांना आढळून आले आहे. यावरून हे स्पष्ट होते की डिझेल गाड्यांची योग्य देखभाल केली तर त्यांची क्षमता अल्पावधीत न खालावता आणखी वाढेल. या गाड्यांमध्ये इंजिन ट्यूनिंग, नियमित सर्व्हिसिंग आणि उत्सर्जन नियंत्रणाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की डिझेल कारची देखभाल केली नाही तर त्या अल्पावधीत BS-IV आणि III या दोन्ही नियमांचे पालन करण्यास अपात्र ठरतील.