scorecardresearch

स्वप्न करा पूर्ण! मारुतीची CNG कार स्कूटीपेक्षाही कमी किमतीत खरेदी करा, मायलेज ३१ किमी

Maruti suzuki CNG Car: मारुतीच्या ‘या’ कारवर मिळत आहे बंपर डिस्काउंट, आत्ताच करा खरेदी…

Maruti Alto 800
मारुतीची कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी (Photo-financialexpress)

Maruti Alto CNG: भारत सरकार १ एप्रिलपासून उत्सर्जनाचे नियम बदलणार आहे. यामुळे, अनेक वाहन उत्पादकांनी त्यांच्या काही गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि उर्वरित स्टॉक साफ करण्यात गुंतले आहेत. या कारणास्तव, सर्व कारवर बंपर सूट देखील दिली जात आहे आणि आता मारुतीने देखील आपल्या एका कारवर सूट जाहीर केली आहे. या कारचे नाव ‘Maruti Alto 800’ आहे जी या महिन्याच्या ३१ तारखेला बंद होणार आहे.

जर तुम्ही ही कार खरेदी केली तर तुम्हाला थेट त्यावर ४०,००० रुपयांची सूट मिळू शकते. कारवालेच्या रिपोर्टनुसार, या मारुती अल्टो 800 वर २०,००० रुपयांची कॅश डिस्काउंट दिली जात आहे. यासोबतच १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५,००० रुपयांचा कॉर्पोरेट बोनसही मिळेल. हे तिन्ही एकत्र केल्यास तुम्हाला एकूण ४० हजार रुपयांची सूट मिळेल.

(हे ही वाचा : Cheapest Tesla Electric Car: लवकरच जगाला मिळणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, एलॉन मस्कची मोठी घोषणा!)

दरमहा केवळ ६,६१३ रुपये भरावे लागतील

आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही मारुती अल्टो 800 पेट्रोल आणि CNG दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करू शकता. यात ७९६cc इंजिन आहे आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. त्याची सुरुवातीची किंमत ३.९७ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. जर तुम्ही ही कार पाच वर्षांच्या ईएमआयवर घेतली तर त्यासाठी तुम्हाला दरमहा ६,६१३ रुपये द्यावे लागतील.

Maruti Alto 800 ही एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे जी पेट्रोल आणि CNG दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, Alto 800 च्या पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज २२.०५ किमी प्रति लीटर पर्यंत आहे आणि CNG व्हेरियंटचे मायलेज ३१.५९ किमी प्रति किलो पर्यंत आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 14:08 IST